________________
महावरिशासन
स्वाभाविक धर्म होय. त्याचेच पालन केलें असतां आत्मकल्याण होईल असा विचार करणें ही धर्मानुप्रेक्षा होय. या बारा अनुप्रेक्षांचा प्रत्येक भव्यजीवानें विचार केला पाहिजे.
मोह व योग यांच्या कमी होण्यानें व नाशानें रत्नत्रयमय आत्म्या - च्या शुद्धतेची जी तारतम्यरूप विशिष्ट अवस्था तिला गुणस्थान म्हणतात. हीं गुणस्थानें चौदा कल्पिलीं आहेत. पहिले मिथ्यात्व गुणस्थान होय. ही मिथ्यात्वी जीवाची अवस्था होय. अशा जीवास हिताहित व बरेवाईट उमजतच नाहीं. व त्यास सम्यक्त्वाची रुचीच. नसते. दुसरें सासादन गुणस्थान होय. सम्यक्त्वापासून च्युत होऊन जेव्हां जीव मिथ्यात्व गुणस्थानास जाण्यास प्रवृत्त होतो तेव्हां त्या अवस्थेस सासा - दन म्हणतात. ज्या गुणस्थानावरील जीवास सम्यक्त्वी व मिथ्यात्वी असे दोन्ही तऱ्हेचे परिणाम होतात त्यास मिश्र म्हणतात. चवथें गुणस्थान असंयत किंवा अविरतसम्यग्दृष्टि होय. या अवस्थेच्या जीवास सम्यक्त्वाची प्राप्ति झालेली असते, पण त्याच्याकडून व्रताचरण होत नसतें. पांचवें संयतासंयत किंवा देशविरत गुणस्थान होय. या अवस्थेतील जीवास सम्यक्त्वप्राप्ति झालेली असते व श्रावकाची व्रतेंहि तो पाळतो. सहावे गुणस्थान प्रमत्तसंयत किंवा विरत होय. या अवस्थेतील जीव मुनित्रतें पाळीत असतो; पण त्याचे हातून क्वचित् प्रमाद घडत असतात. सातवें अप्रमत्तविरत किंवा संयत गुणस्थान होय. या गुणस्थानावरील मुनींचे हातून प्रमाद घडत नाहींत. आठवें अपूर्वकरण गुणस्थान होय. या स्थानावरील मुनींच्या कर्मबंधाचा नाश झपाट्याने होत असतो.. अशी स्थिती त्यानें पूर्वी कधीही अनुभवलेली नसते. नववें गुणस्थान अनिवृत्तीबादरसापराय किंवा अनिवृत्तिकरण होय. या स्थानावरील जीव प्रतिक्षणी झपाट्याने शुद्ध होत जातो. दाहवें सूक्ष्मसांपराय गुणस्थान होय. या स्थानावरील जीवाचे कपाय सूक्ष्म झालेले असतात. अकरावें उपशांतमोह किंवा उपशांतकषायवीतरागछद्म स्थगुणस्थान होय. या स्थानावरील जीवास मोहनीय कर्माच्या उदयामुळे पुन्हा पतितावस्था प्राप्त होण्याचा संभव असतो, तो सहाव्या किंवा सातव्या गुणस्थानावर पुन्हा जातो. बारावें क्षीणमोह किंवा क्षणिकषायवीतरागछद्मस्थगुणस्थान होय. या अवस्थेतील जीवाची ज्ञानावरणीय, दर्शनावरणीय, मोहनीय व अंतराय अशीं चार कर्मों समूळ नाश (७७)