________________
महावीरचरित्र
कालनिर्णयाप्रमाणे बऱ्याच बाबींचा उलगडा होत असल्यामुळे तोच योग्य बाटनो. बाद्धग्रंथांतून म्हटले आहे की, नातपुत्त महावीरांचा प्रभाव बराच पडला होता, पण म. बुद्धांच्या दिव्योपदेशामुळे तो क्षीण झाला. या म्हणण्याचाहि विचार करणे जरूर आहे. उलट जैनधर्मशास्त्रकारां हि म्हटले आहे की, महावीर भगवानांचा उपदेश सुरू झाल्याबरोबर बौद्धादि एकांतमताचा विच्छेद झाला. वरील दोन्ही लिखाणे अगदी स्वाभाविक अशीच आहेत; कारण प्रत्येकाला स्वमताचे महत्त्व असणारच. पण मग म. बुद्धांच्या आयुष्यात त्यांच्या वयाच्या पन्नास ते सत्तर वर्षामधील इतिहास तेवढा बौद्धशास्त्रकारांनी का वर्णिलेला नाही ? यावरून हे स्पष्ट होते की, ही वर्षे शैद्धधर्माला भरभराटीची गेली नाहीत. त्याचप्रमाणे एका महत्त्वाच्या राजकीय घटनेमुळेहि वरील विचारासच पुष्टि मिळते. श्रेणिकबिंबिसाराच्या मरणानंतर लगेच अजातशत्रु किंवा कुणिक बुद्ध का झाला ? याच वेळी त्याला बौद्धधर्म पटला असें थोडेच आहे ? तो क्षायिकसम्यक्त्वी श्रोणिकाच्या मरणाला कारण झाला म्हणून पितृघ्न अजातशत्रु जैनांच्या दृष्टीने अगदी घृणित ठरला होता. अशा वेळी बौद्धसंघानें त्याला जवळ केला असल्यास त्यांत काय नवल ? त्यामुळे श्रेणिकाच्या मरणानंतर मगध व अंगदेशचे राज्य बाद्धधर्माचे झालेले त्या धर्माच्या प्रभावामुळे नव्हे हैं उघडच आहे. त्यानंतर थोड्याच वर्षांनी भगवान महावीर निर्वाणाला गेले. त्यावेळी आजीवक पंथाचा राजा पद्म याने जनसंघाचा छळ केला असा उल्लेख आहे. तो जैन व बौद्धग्रंथानुसार व वरील कालनिर्णयाप्रमाणे बरोबर जुळतो. वीरशासनाचा पूर्वी प्रभाव फार होता व नंतर कमी झाला हे बौद्धाचायाँ, मतहि वरील घटनेनुसार खरे ठरते. शिवाय महावीर भगवानांनी सुरू केलेली धर्मप्रभावना म.बुद्धाच्या मध्यममार्गात आडवी आली होती असें बौद्धग्रंथांतहि म्हटलेले आहे महावीर भगवानांच्या निर्वाणापूर्वी दोनतीन वर्षेच दवदत्ताने बौद्धसंघांत वाद उपस्थित केला होता. त्याचे म्हणणे संघातून मांसाशन बंद करून भिक्षूना आधिक संयमी बनवावे असे होते. या प्रश्नावरच दोन तट पडले. मांसाशनत्यागाचा उपदेश महावीरस्वामीशिवाय दुसरे कोणीहि त्यावेळी करीत नसल्यामुळे त्यांच्याच उपदेशाचा परिणाम बौद्धसंघावर झाला हे उघड आहे. बौद्धांच्या महावग्गग्रंथावरून असे कळतें कीं, भिक्षंना नमावस्था धारण करण्याची आज्ञा देण्याविषयी काही भिक्षुनीं म. बुद्धाला सारखा तगादा लावला होता. दिगम्बर संघाच्या
(५४)