________________
जन्मस्थान व वर्षानर्णय.
प्रभावामुळे भिक्षंचे महत्त्व कमी होत चालले होते असे यावरून दिसते. म. बुद्ध अन्धकविन्दांत होते, तेव्हा त्यांच्याबरोबर १२५० भिक्षु होते व काही वर्षांनंतर कसीनाराला ते होते तेव्हां त्यांच्याबरोबर अवघे २५० च भिक्षु होते यावरून हे उघड दिसते की, इतर जनतेप्रमाणेच महावीरस्वामींच्या उपदेशाचा प्रभाव बौद्धभिक्षुसंघावरहि पडत होता. तीर्थकराच्या जीवनांत सर्वज्ञ होऊन धर्मप्रभावना करण्याचाच प्रसंग अद्वितीय प्रभावशाली असतो. तेव्हां या प्रसंगाचा प्रभाव बौद्धसंघावरहि पडला. तीर्थकराचा विहार समवसरणासहित होतो व उपदेश शास्त्रसिद्ध आणि अनुभवगोचर असतो, कारण ते स्वतः कंवलज्ञानी असतात. तीर्थकरांच्या पुण्यप्रकृतीच्या प्रभावामुळे आसपास चारशें योजनें दुर्भिक्ष रहात नाही व समवसरणाच्या मानस्तभाचे दर्शन घडले की, मिथ्यात्व दूर होते. अशा पार महात्म्याचा प्रभाव म. बुद्ध व त्यांच्या संघावर पडला असल्यास त्यांत नवल कसले ? म्हणूनच बहात्तराव्या वर्षी राजगृहनगरीत म. बुद्ध आले असतां एका कुंभाराच्याच घरी रात्र काढावी लागली. बौद्धग्रंथांतच खालील उदार आहेत. “पावापुरीच्या चण्ड नांवाच्या व्यक्तीने मल्लदेशांतील सामगावांत असलेल्या आनंदाला महावीर तर्थिकरांच्या निर्वाणाची बातमी दिली, ती ऐकून मानंद म्हणाला, "मित्रा चंडा : ही वार्ता तथागत बुद्ध भगवानाला कळविली पाहिजे. चल आपण त्यांच्याकडे जाऊन ही बातमी देऊ.” म. बुद्धाला ही बातमी कळविल्याबरोबर त्याने संघापुढे एक महत्त्वपूर्ण व्याख्यान दिल." या उद्गारावरून बौद्धसंघाला महावीरनिर्वाणाचे किती महत्व वाटले ते दिसून येते. आतांपर्यंत मध्यम मार्गाच्या प्रसारांत म. बुद्धाला जो अडथळा होता तो आतां दूर झाला. वारनिर्वाणानंतर म. बुद्ध व त्याचा शिष्य सारीपुत्त यानीं मध्यम मर्गाचा प्रचार बराच केला. वरलि सर्व विवेचनावरून डॉ. हॉर्नलेसाहेबाचाच कालनिर्णय सर्व घडामोडींशी जुळतो असे दिसून येते. बौद्ध शास्त्रात एके ठिकाणी आपण सर्व मतप्रवर्तकांत लघु आहात का अमें विचारले असतां म. बुद्धांनी मौन सेविल्याचा उल्लेख आहे. हे लनुत्व वयाच्या दृष्टीनं नसून मताच्या दृष्टीने होते हे उघड आहे. वयाने ते महावीरस्वामीपेक्षा मोठे होते व मताने मात्र सर्व मतांत अर्वाचीन अर्थात् लघु होते यांत शंका नाही.
वीरनिर्वाणाबद्दल तीन मते जी प्रचलित आहेत ती वर दिली आहेत. त्यांपैकी इ. स. पू. ५२७ हे मत हल्ली रूढ आहे. दुसरे मत डॉ. जॉर्ज चापेंटर यांचे
(५५)