________________
महावीर समकाल
असे सिद्ध होते. म्हणजे महावीरस्वामींच्या जन्माच्या वेळी म. बुद्ध तीन वर्षाचे होते. त्यांच्या दीक्षेच्या वेळी ते तेहतीस वर्षांचे होते व त्यांना केवलज्ञानप्राप्ती होऊन त्यांनी धर्म प्रभावनेला सुरवात केली तेव्हा ते पंचेचाळीस वर्षांचे होते असें उरते. उलट ज्यावेळी म. बुद्धाने आपल्या पस्तीसाव्या वर्षी मध्यम मार्गाचा उपदेश सुरू केला तेव्हां भगवान महावीर सुमारे तेहतीस वर्षांचे होते असे म्हणावें लागेल. प्रो. कर्नसाहेबांच्या मतानुसार म. बुद्ध बहात्तर वर्षांचे असतांना श्रेणिक विंबसार मरण पावला व त्यानंतर थोड्याच वेळाने बौद्धसंघात देवदत्तानें फूट पाडली. मज्झिमनिकायांतील अभयराजकुमार मुत्तावरून हे स्पष्ट होने की, या दुफनीची वार्ता भगवान महावीरांना समजली होती. दिगंबरग्रंथांतूनहि लिहिले आह की, सम्राट श्रेणिक कालवश झाल्याबरोबर अजातशत्रु मिथ्यात्वी झाला व चलना राणीने महावीरम्बामीकडे जाऊन आर्याचंदनाजवळ दीक्षा घेतली. यावरून ही गेष्ट स्पष्ट होते की, भगवान महावीर त्यावेळी इहलोकी होते, व बौद्धांच्या सामयगामसुत्त व चाटिकामुनावरून असें ठरते की,महावीर स्वामींच्या निर्वाणानंतर म.बुद्ध काही वर्ष हयात होते.यावरून ते जास्तीतजास्त पांच वर्षेच महावीरस्वामीनंतर हयात असावेत असे दिसते; कारण जैन व बौद्ध या दोन्ही ग्रंथांच्या आधारें सम्राट श्रेणिक बिबिसाराच्या मरणाचे वेळी महावीर स्वामी इहलोकीच होते. ज्याअर्थी यावेळी म. वुद्ध बहात्तर वर्षांचे होते त्याअर्थी भगवान महावीर निदान एकुगसत्तर वर्षांचे असले पाहिजेत. म्हणून महावीर स्वामींच्या निर्वाणानंतर म. बुद्ध पांच वर्ष हुन अधिक काल हयात नव्हते असें सिद्ध होते. म. बुद्धाचे देहावर बालपणी जी चिन्हें होती ती चार तीर्थकारांची होती व त्यांत महा. वीरस्वामींचें नांव होते; लाछन नव्हते. इतर तीर्थकरांची लांछनें होती. यावरून महावीरस्वामींचा अजून जन्म व्हावयाचा होता असे सिद्ध होते. त्याप्रमाणे म. बुद्धाच्या पन्नासीनारच्या वीस वर्षांचा इतिहारा चांगला मिळत नाही. यावरूनहि काही अनुमान काढतां येते. ज्या वेळी भगवान महावीरांनी धर्मप्रभावनेस सुरवात केली, त्यावेळी म. बुद्ध पंचेचाळीस वर्षांचे होते व मध्यम मार्ग उपदेशन चुकले होते. नंतर पांच वर्षात वीरशासनाचाच विशेष फैलाव झाला असल्यास त्यांत कांहींच नवल नाही. नंतरच्या वीस वर्षांत बौद्धग्रंथांतूनहि म. बुद्धांच्या हालचालीबद्दल काही विशेष माहिती मिळत नाहीं; कारण हीच वर्षे भगवान महावीरांच्या धर्मप्रभावनेची होती. डॉ. हार्नले साहेबांच्या
(५३)