________________
महावीरचरित्र
५२७
नांवाच्या पुरुषानें भरतखंडांत प्रचार केला असें वरील श्लोकांत म्हटलें आहे. सरस्वतगिच्छाच्या प्रस्तावनेत ' बहुरि श्रीवीरस्वामकूं मुक्ति गये पीछे चार सें सत्तर वर्षे गये पीछे श्रीमन्महाराज विक्रमराजाका जन्म भया " असें स्पष्ट म्हटलें आहे. नेमिचंद्राचार्याच्या ( श्वेतांबरी) महावीरचरित्रातहि महावीर - स्वामींच्यानंतर सहाशेपांच वर्षे पांच महिन्यांनी शकराजा झाला असें म्हटलें आहे. नन्दीसंघाची पट्टावली व सरस्वतीगच्छाची पीठिका यांतील वर दिलेल्या वचनांत महावीरनिर्वाणानंतर ४७० वर्षांनीं विक्रमाचा जन्म झाला असें स्पष्ट म्हटलें आहे. विक्रमाचा संवत् त्याच्या वयाच्या अठराव्या वर्षी सुरू झाला हें प्रसिद्धच आहे. इसवीसनाहून विक्रमसंवत् ५७ वर्षांनी प्राचीन व विक्रमसंवताहून वरिनिर्वाण काल ४७० + १८ म्हणजे ४८८ वर्षांनीं प्राचीन म्हणजे तो इ. स. पू. ५४५ ठरतो. तर मग इ. स. पू. कसा मानण्यांत आला ? याचे कारण विक्रमाच्या अठरावे वर्षी विक्रमसंवत् सुरू झाला हे लक्षांत न घेतां चालू विक्रम संवतांत ४७० वर्षे मिळवून जिनांनीं वीरसंवत् गणला हेंच होय. वीरनिर्वाणानंतर ६०५ वर्षे पांच महिन्यांनी शकराजा झाला, या अभिप्रायाला मात्र जैनांनी गणलेला प्रचलित गोरसंवत् बरोबर जुळतो. तेव्हा विक्रमराजा झालेल्या वर्षापासून विक्रमसंवत पुण्यास सुरवात झाली, हें म्हणणें तरी खोटें ठरविले पाहिजे किंवा वीर - राणानंतर ४७० वर्षांनी विक्रमाचा जन्म झाला अशा आशयाचे आधार खोटे ठरविले पाहिजेत. दोहोंकडून आपत्तिच आहे पण शालिवाहन शींवर दिलेले दुसरे आधार व प्रचलित वीरसंवत् जुळत असल्यामुळे खरा ठरवितां येण्याजोगा आहे. पण बाबूकामताप्रसादजींनीं आपल्या नू महावीर व म. बुद्ध या पुस्तकांत जे विचार प्रदर्शित केले आहेत तेहि लक्ष की, मह तंत घेणें जरूर आहे. ते लिहितात, " जैनग्रंथावरून हे निश्चित आहे वीरस्वामींना मोक्षलाभ वयाच्या बहात्तराव्या वर्षी झाला व बौद्धग्रंथावरून हि निश्चित आहे कीं, महावीर बुद्ध वयाच्या ऐंशीव्या वर्षी निर्वापाला गे अधिढले. यावरून ही गोष्ट स्पष्ट आहे की, " गौतमबुद्ध महावीरस्वामीपेक्षां बीन वर्षे जगले. आतां डॉ. हार्नलेसाहेबांनी असें सिद्ध केलें आहे कीं, महाकरस्वामी मोक्षाला गेल्यानंतर पांच वर्षांनी म. बुद्ध निर्वाणाला गेले. अर्से मानल्यास महावीरस्वामीच्या जन्मापूर्वी तीनच वर्षे म. बुद्धाचा जन्म झाला ( ५२ )
भगव
,
नि
तरी
शक
तोच
"