________________
महावीर समकाल
•
स्थिति चांगली होती. पण सामाजिक व धार्मिक परिस्थिति अगदीं बिघडली होती. पहिल्या दोन बाबतींतील चांगल्या परिस्थितीचा परिणाम दुसन्या दोन बाबतीतील परिस्थिति सुधारण्याकडे होत नसे, पण धार्मिक व सामाजिक शोचनीय परिस्थितीचा परिणाम आर्थिक व राजकीय सुस्थितीवर जरूर होत असे. काल हमेशा एकसारखा रहात नाहीं, व कोणतीहि परिस्थिति कायम टिकत नाहीं. जगांत असें कांही अभव्य आत्मे आहेत कीं, जे नेहमी संसारांत गोते खातच राहणार व सामाजिक परिस्थिति बिघडविणार. कधीं सुख व कधी दुःख त्यांनाहि मिळत असते; पण सुखदुःखापासून पूर्णपणे सुटका त्यांची कधीं होत नाहीं. भव्यजीवांना तरी हा मोक्ष सोपा थोडाच आहे ? पूर्वशुभकमोंदयामुळे काललब्धि झाली तर मोक्षमार्गावर ते येतात; नाहीं तर तेहि गोते खातच भवचक्रांत फिरत राहतात. म्हणूनच अवसर्पिणी व उत्सर्पिणी असे कालाचे भेद पडलेले दिसून येतात. कर्मानुसार जीवांना बुद्धि होते व कालानुसार यशापयश मिळतें. दोन्ही प्रकारचे जीव अनादिकालापासून आहेत. ऋषभदेवांनी यथार्थ मार्ग घालून दिला, पण त्यांचाच नातू मरीचि मिथ्यात्वाचा प्रवर्तक बनला. असे हे घडावयाचेंच. आज तरी वीरकालीन परिस्थिति कोठें राहिली आहे ? त्यावेळी राजकीय व आर्थिक परिस्थिति तरी चांगली होती पण आतां तीहि अतिशय बिघडली आहे. धार्मिक व सामाजिक बाबतीतहि मिथ्यात्व व असमतेची वाढच झाली आहे. कालक्रमाच्या ठराविक नियमानुसार आतां तीर्थकर अवतरून सद्यः - स्थिति सुधारणे शक्य नसले तरी कोणीतरी सिद्ध महात्मे होणें जरूरच आहे, व त्यांच्या आगमनाला अनुकूल भूमिकाहि तयार होत आहे. महावीरकालीन भरतखंडच आजहि आहे; पण त्या कालाप्रमाणे प्रतिभासंपन्न, शक्तिशाली व दीर्घायुपी लोक आता नाहीत. हल्लीचे भारतीय दीनदुबळे झाले आहेत. बुद्धि, शक्ति, ऐश्वर्य वगैरे गमावून बसले आहेत. त्यावेळी सर्व जगाला भारतवर्ष आदर्श होता, पण आज भारतीय त्यांचे दास बनले आहेत, व प्रत्येक बाबतीत परकीयांच्याच ओंजळीने पाणी पीत आहेत. आपल्या प्राचीन वैभवाची आठवण त्यांना होत असते, पण पूर्वजन्मी केलेले पराक्रम त्यांचे हातून होत नाहींत. ते होतील तेव्हांच सद्य:स्थिति बदलेल. महावीरकालाप्रमाणेच आतांहि क्रांतीची आवश्यकता आहे. तत्कालीन प्रजा कांही बाबतींत पीडलेली होती पण हल्लींचे भारतीय सर्वच बाबतीत पीडलेले असून परिस्थितीला कंटाळलेले आहेत. काला( ४७ )