________________
महावीरचरित्र
नुसार ही परिस्थिति बदलेलेच, पण तशी तयारी होण्यासाठी वरिकालाचा प्राचीन इतिहासहि त्यांना अनुकरणीय आहे.
प्रकरण ५ वें.
जन्मस्थान व वर्षनिर्णय. इ. स. पू. सहाव्या शतकांत जी गणराज्य होती व त्यामध्ये जे क्षत्रियवंश प्रख्यात होते त्यांपैकींच लिच्छवी हा एक वंश आहे. या वंशाचे रीतिरिवाज, शासनप्रणाली, धार्मिक व इतर कल्पना बन्याच विशुद्ध होत्या. लिच्छवीवंशांची बहुतेक सर्व घराणी जनधर्माचीच होती. हा वंश मूळ इक्ष्वाकुवंशांतलाच व याचे गोत्र वशिष्ट. लिच्छवीवंशांत झालेल्या मुसंस्कृत व पराक्रमी क्षत्रियामुळे हा वंश फार मानला जात होता व इतर वंशाचे क्षत्रिय या वंशाशी सोयरीक करण्यांत धन्यता मानीत असत. लिच्छवी वंशाचे क्षत्रिय वज्जियन संघाचे मानले जात; कारण त्यांची सत्ता सर्व वज्जियन किंवा वृजदेशावर होती. या संघामध्ये आठ निरनिराळ्या जातींचे क्षत्रिय होते. त्यांत लिच्छवीवंश श्रेष्ठ होता. या सर्व जातींमध्ये सख्य असल्यामुळे कधी दुफळी माजली नाही व वृजदेश सर्व दृष्टीने समृद्ध राहिला. बृजदेशांत शांतता व समृद्धि असल्यामुळे अर्थातच कला व मौज शोकाची वृद्धि झाली. तथापि हे क्षत्रिय विलासप्रिय झाले नाहीत. म्हणूनच त्यांचे वैभव टिकून राहिले. त्याकाळी मगधाधिपाने बराच धुमाकूळ माजविला होता. पण वज्जियन संघांपुढे त्यांचेहि काही चालले नाही. तक्षशिला येथील विद्यापीठ त्यावेळी बरेंच भरभराटीत होते व बहुतेक सर्व क्षत्रिय तरुण तेधून सर्व विद्या शिकून येत. त्यामुळे ते सुसंस्कृत व निर्व्यसनी असत. पराक्रमामुळे व संस्कारितेमुळे या क्षत्रियवंशांतून कृत्रिम उच्चनीचता मानली जात असे व म्हणून लिच्छवीवंशांत इतर वंशांतून मुली येत. पण लिच्छवीवंशाच्या मुली इतर वंशांतील तरुणांना दिल्या जात नसत. वैशाली राज्याचे बाहेर मूली देता येणार नाहीत अशी रूढी होती. त्यामुळे वैशालीचा राजा चेटकाने आपली मुलगी मगधेश श्रेणिकालाहि प्रथम देण्याचे नाकबूल केलें होते, पण घराण्यांची अनुरूपता पाहून रूढी मोडूनहि पुढे सोयरिक झाली या