________________
महावीरचरित्र
ती महावीरस्वामींनींच बंद पाडली. हिंसात्मकयज्ञ, कर्मकांड व हटयोग हेच त्यावेळीं धर्म मानले जात असत. त्यामुळे धर्माचे ऐवजी ढोंग व अधर्मच सर्वत्र पसरलेला होता. अनात्मवादाचें सार्वभौम राज्य होते. समाजाचा आत्मा घोर अंधःकारांत पडला होता व प्रकाश मिळावा म्हणून धडपडत होता. यज्ञांतील पशुहिंसेमुळे मानवांची हृदयें कठोर व निर्दय तर बनत होतीच पण इतरांच्या जीवांची त्यांना कांही किंमतच वाटेनाशी झाली होती. स्वसुखाखातर ते वाटेल तें करावयास तयार होत असत व जड वस्तूंचे महत्त्वच त्यांना अधिक वाटू लागले होते. अध्यात्मिक बाबीकडे अगदी दुर्लक्षच झाले होते असें म्हणावयास हरकत नाहीं. यज्ञ केले की पातकांचा परिहार होतो व सर्व सुख प्राप्त होतात अशी समाजाची भावना झाली असल्यामुळे पाप करण्यास समाज कचरत नसे व मुखासाठीं पुरुषार्थहि करीत नसे. असल्या समाजांत पावित्र्य व निर्दोष जीवन कोन असणार ! आत्म्यावरील पापांचे कलंक पुसून काढण्यास पश्चात्ताप व प्रायश्चित्ताची मुळींच जरूरी नसून मांस, तूप व हवि जान नित्रणाच्या धुरानेच हे कलंक पुसले जातात अशी उलटी कल्पना रूढ होती. पण या धुरानें आत्म्याची कलुषितता अधिकच वाढत होती. शिवाय यज्ञ करणें हीहि काही सोपी बाब नव्हती. बराच पैसा खर्च करावा लागत असल्यामुळे थोडे क्षत्रिय व वैश्यच यहसमारंभ करूं शकत. त्यामुळे बहुजनसमाज या कर्मकाण्डाच्या विरुद्ध बनला. खडतर तपश्चर्या केल्याने आपणांला ऋद्धिसिद्धि प्राप्त होतील व देवी शक्ति प्रगट होतील आणि नैसर्गिक शक्तीवरही आपला ताबा राहील अशीहि कल्पना रूढ होती. आत्मा देहरूपी कारावासांत आहे, त्याला त्यांतून सोडविला की तो मुक्त होईल अशीहि कल्पना असल्यामुळे ऐहिक व परमार्थिक अशा दोन्ही हेतूने कांहीं सामर्थ्यवान् लोक हटयोगाचा अवलंब करीत असत. पण अनुभवानें मनःशांति देण्यास हटयोग, कर्मकांड व हिंसात्मक यज्ञ यांपैकी कांहींच उपयोगी पडत नाहीं असें समाजाला दिसून आले. त्यामुळे प्रचलित धर्माविरुद्ध विचारी लोक बोलू लागले होते. पण नवा धर्म समाजापुढे ठेवण्याइतकें सामर्थ्य त्यांच्यामध्ये नव्हतें. तें काम भगवान महावीर व म. बुद्धाचेच होते. समाजाची मनोभूमिका तयार असल्यामुळे वरील दोन महापुरुषांचे कार्य सुलभ झाले. "
याप्रमाणें महावीरस्वामींच्या वेळेची परिस्थिति होती. राजकीय व आर्थिक ( ४६ )