________________
महावीर समकाल
त्याकडे पाहतां आमची वरील विधानेंच खरी ठरतात. सध्यांसारखें जातिभेदाचें वेड त्या वेळेस मुळीच नव्हते. फक्त वर्णाश्रमपद्धतीच अस्तित्वात होती. धर्माबद्दल निरनिराळी मते होती; ती मर्जीप्रमाणे बदलली तरी जात बदलत नसे. म्हणजे धर्ममत बदलले तरी जातीला बट्टा लागत नसे. असो. या धार्मिक बाबीप्रमाणेच सामाजिक बाबतीत चातुर्वण्यांच्या मूळ हेतूचा दुरुपयोग करून ब्राह्मणांनी स्वार्थसाधनास सुरुवात केली होती. धर्मगुरुत्व आपणाकडे घेऊन धर्मग्रंथवाचनाचा व साब होण्याचा अधिकार त्यांनी इतर वीपासून हिरावून घेतला होता. क्षत्रियवेश्यादिकांना या अतिक्रमणाची फार चीड आली होती व ते बात गांचे वर्चस्व झुगारून देण्यास आतुर झाले होते. अशा वेळी मोक्षसाधनाचा सवाना अधिकार आहे असे सांगणारे महावीर व वाटेल त्याला भिक्षु करून घेणार गौतमबुद्ध अवतरल्यावर त्यांच्याकडे सर्व समाज झुकला असल्यास त्यांत काही नवल नाहा.
या धार्मिक व सामाजिक स्थितीचा परिणाम राजकीय परिस्थितीवर झाल्याशिवाय मुळीच राहिला नाही. जैन व बौद्धांच्या अहिंसात्मक शिकवणीमुळे समाज निर्बल बनला व राष्ट्र परतंत्र झाले असा सिद्धान्त कांहीं दीड शहाणे टोकन देतात; पण अहिंसा आत्मबल वाढविणारी आहे, पौरुष खच्ची करणारी नाही हे या मृढांना कळत नाही त्याला निरुपाय आहे. अहिंसेची शिकवण बलात्कार, अत्याचार, क्रौर्य. परपीडन, वगरे शिरजोरीला रोकील, सामथ्याला रोकणार नाही. तसे असते तर अहिंसेची ओळरसहि नसलेले कोट्यावधि लोक मोठे शर निपजले असते व म. गांधींसारखे अहिंसक वीर निर्माण झालेच नसते. पौरुप नाहीस होतें तें अहिंसेच्या पालनाने नमन चनबाजीन आणि बेजबाबदार वृत्ति व ईश्वरच्छावादाने होते. ज्या समाजाची धार्मिक कृत्येसुद्वा मांसाशन, मुरापान, व इतर स्वेच्छाचाराशिवाय होत नाहीत त्या समाजाची चैनबाजी काय वर्णावी? ब्राह्मणाकडे सर्व पापपुण्यांचा मक्ता देऊन व ईश्वरेच्छेचा हवाला देऊन मनसोक्त वागणा-या लोकांची बेफिकिरी व स्छेच्छाचारवृत्ति तरी किती वर्णावी ? महावीरकालीन समाजांत यज्ञमार्गीयांच्या व नियतिवाद्यांच्या सुळसुळाटामुळे ही स्वेच्छाचारवृत्ति फार बोकाळली होती व म्हणूनच समाज कर्तव्यशून्य बनला होता, पुढेहि मायावाद व ईश्वरेच्छावाद जसजसे फैलावत गेले तसतशी महंमदी व स्त्रिस्ती लोकांची साम्राज्ये वाढत जाऊन हिंदुसमाज कर्तृत्वशून्य बनला हे
(४१)