________________
महावीरचरित्र
आहे असे म्हटले जाते. मनुष्यजन्म हा तर रत्नचिंतामणी आहे. मनुष्यभवांत मोक्षपद प्राप्त करून घेणे शक्य असते. तीर्थकरांचा उपदेश अंगी बाणून घेऊन त्याप्रमाणे व अनंत-सिद्धांच्या मार्गाने प्रत्येक जीवाने प्रयत्न करून अव्याबाध व स्वाभाविक सुखाची प्राप्ति करून घेतली पाहिजे. या बाबतीत सर्व भव्यजीव समान अधिकारी आहेत. तीर्थकराच्या जीवालाहि कर्मभोग चुकले नाहीत. त्यांनाहि कर्मबंध टाळण्यासाठी खडतर तपश्चर्या करावी लागली; तेव्हांच त्यांना मुक्तिसुख प्राप्त झाले. प्रत्येक जीवाला तसेंच करणे भाग आहे. त्यासाठी त्यालाच प्रयत्न केले पाहिजेत. तीर्थकर व सिद्ध परमात्मे केवळ ध्येय म्हणून पुढे ठेवण्यास उपयोगी आहेत. त्याहून त्यांची अधिक मदत होणे शक्य नाही. जसें व जितकें कर्म जीव करील तसें व तितकें फल त्याला मिळेलच असा स्वभाव-सिद्ध कायदाच आहे. हा कोणाच्या मर्जीचा प्रश्नच नाही. महावीर तीर्थकराच्या पूर्वभवावरून हाच बोध घ्यावयाचा की कर्मफल कोणालाहि सुटणे नसून प्रत्येकानें ते प्रयत्नानेच टाळले पाहिजे. तीर्थकर म्हणजे किती बलिए आत्मसत्ता आहे ते तीर्थकर महात्म्यांत सांगितले आहे. प्रत्येक जीवाला तसे होतां येणे शक्य नसलें तरी सर्व भव्यजीवांना त्यांची सिद्ध पश्वी प्रात करून घेता येईल. प्रत्येक जीवाची तीच स्वाभाविक स्थिति आहे व ती गांटणेच प्रत्येक जीवाचे कर्तव्य आहे.
प्रकरण चवथें.
महावीर समकाल. पार्श्वनाथ तीर्थकरांना होऊन अडीचशेच वर्षे झाली होती, पण एवढ्या काळात फिरून मिथ्यात्वाला फारच जोर चढला होता. दिवा विझतांना ज्याप्रमाणे मोठा होतो त्याप्रमाणेच खोट्या उपासनामार्गाच्या मिथ्यात्वापुरता तरी निदान तो खरा ठरला असें म्हणावयास हरकत नाही. कारण महावीरतीर्थकर लगेच अवतरले व त्यांच्याबरोबरच सिद्धार्थ गौतमहि हिंसात्मक यज्ञ व असंख्य देवतोपासनेला विरोध करण्यास त्याच वेळी सज्ज झाले. या दोन थोर पुरुषांच्या सामुदायिक बलामुळे वेदमार्गाचे मिथ्यात्व जवळ जवळ जमिनदोस्तच झाले होते असे म्हणण्यास हरकत नाही, व शंकराचार्यांनी जेव्हां वैदिक धर्माचें पुरुज्जीवन