________________
महावीर पूर्वकाल
कच्छप्रांतांतील हेमपूरचा राजा कनकाभ याचे पोटीं तो जीव कनकध्वज नांवाने जन्मला. उत्तम रीतीने संसार करून शेवटी कनकध्वजाने दिगम्बर दक्षिा घेतली. सल्लेखनावताने देह सोडून तो जीव आठव्या स्वर्गात देव झाला. पुढे हा जीव उज्जयिनी नगरीचा राजा वज्रसेन व राणी सुशीला यांचे पोटी हरिषेण नांवानें जन्मला. संसार करीत असतांना श्रावकवते पूर्णपणे पाळून शेवटी सुप्रतिष्ठ मुनीजवळ त्याने दक्षिा घेतली व समाधीमरण साधून तो जीव प्रतिवर्धन विमानांत वैमानिक देव झाला. तेथून हा जीव क्षेमाति नगरांत धनंजय राजाचे पोटी प्रियमित्र नांवा जन्मला. त्याने जिनभक्ति केली व पुढे चक्रवर्ती झाला. शेवटी चक्रवर्ती पद सोडून त्याने क्षेमकर मुनींच्या जवळ दीक्षा घेऊन समाधी गण साधन तो रूचक वैमानिक देव झाला. तेथून तो जीव श्वेतात्पात्रा नगरीत राजानंदवर्धन व राणी वीरवती यांच्या पोटी नंदन नांवानें जन्मला. नंदवर्धनाने नंदनाला राज्य देऊन पिहिताश्रव मुनीजवळ दीक्षा घेतली. मुनीजवळून आपले पूर्वभव ऐकून नंदनालाहि एकदम वैराग्य उत्पन्न झाले व सल्लेखना साधून तो पुप्पोनर विमानांत देव झाला. हा देवच पुढे महावीर तीर्थकर म्हणून जन्मला.
याप्रमाणे थेट ऋषभतीर्थकरांचे कालापासून महावीर स्वामींचा जीव मुक्तीसाठी धडपडत आहे. मध्यंतरी त्या जीवाने तीर्थकर नामगोत्रकर्म बांधल्यामुळे महावीर ताथकर होऊन तो मोक्षाला गेला. हे भवभ्रमण जीवाला फारच गांजते. मोक्षाची स्वाभाविक स्थितीच खरी सुखदायक होय. पण पौगलिक सुखाच्या नादी लागून जीव आर्त व रौद्रध्यान लावतो व त्यामुळे कर्मबंध होऊन त्याची फलें भोगण्यासाठी अनेक जन्ममरणांचे फेरे जीवाला फिरावे लागतात. ही फलें भोगतां भोगतांच नवे कर्मबंध होतात व रहाटगाडगे तेव्हांच थांबतें की जेव्हां जीव धर्म व शुक्लध्यानी रत होऊन नवे कर्मबंध होऊ देत नाही, व तपश्चरणाने जुने कर्मबंध छेदून टाकतो. महावीर तीर्थकरांनी तसे केलें व जितकें जीव आजपर्यत सिद्ध पदवीला मोहोंचले त्या सर्वांना असेंच करावे लागले. अनंत सिद्धांनी हा मार्ग आपल्या आचरणाने भव्यजीवांना घालन दिला आहे व तोच तीर्थकरांनीहि उपदेशिला आहे. हल्ली जे अनंत जीव या कर्मभूमीत आहेत त्या सर्वांना कर्मबंध करण्याची किंवा न करण्याची मुभा आहे. भोगभूमीत असलेल्या जीवांना केवळ कर्मफले भोगण्याची सत्ता आहे. नवे कर्मबंध बांधण्याची किंवा जुने छेदण्याची शक्ति त्यांना नाही. म्हणूनच रत्नत्रयीला साधक केवळ ही कर्मभूमीच
(३५)