________________
महावीर समकाल
८८
केलें तेव्हांहि हिंसात्मक तामसी यज्ञपद्धति अजीबात बंद करून त्यांनी बौद्ध व जनमताचा विजय मान्य केला यांत मुळींच शंका नाहीं. शंकराचार्याच्या ब्राह्मणी धर्मावर जैनमताचा छाप पडली याबद्दल १९०४ साली बडोद्यास भरलेल्या जैन कॉन्फरन्सचे वेळी खालील उद्वार टिळकांनी काढलेले आहेत: जैन धर्माचें महत्त्व आज ब्राह्मणधर्मानुयायांस बरोबर कळत नाही तसे दोन हजार वर्षापूर्वी नव्हते. जैनधर्म व ब्राह्मणधर्म यांचा त्यावेळी मोठा झगडा चालला होता. अहिंसा व मुक्तिसाधनाचे सर्व वर्णाना ज्ञानदान हीं तखें जैनांनी प्रमुखपणे स्वीकारली होती. मीमांसक मुक्तीकरिता हिंसात्मक यज्ञयाग करीत. पशुवधानें मोक्षप्राप्ति हो नाहीं असे गाजवून सांगून जर कोणी दयेचा ध्वज प्रथम उभारला असेल तर तो मान जैनांनाच आहे. ब्राह्मणधर्म व जैनधर्म यांच्या तंट्यांतील कारण हिंसाच होय ...... अहिंसेचे तत्त्व पूर्णपणे पाळणारे लोक पृथ्वीवर जैनच आहेत. पंचद्रविड ब्राह्मण निवृत्तनांस आहेत हा जैनांचाच प्रताप होय. अशा रतिीनें दुसया धर्मावर छाप बसवून जय मिळविल्यामुळे जनांनी जैन हे नांव अन्वर्थ केलेले आहे पशुयज्ञ वेदविहित मानला असल्यामुळे ब्राह्मग सोडीनात आणि जैन म्हणत की, वेदांत हिंसा असेल तर ते वेद आणि अहिंसेने तृप्त होणाऱ्या देवता आम्हांस पूज्य नाहीत. वेदामध्ये पशुतासंबंधीचे जे श्रोतप्रकरण आहे त्यावरून जैनांना वेदांचे प्रामाण्य नाकवल करावे लागले. शेवटीं ब्राह्मणांनी जैनांचे अहिंतातत्त्व स्वीकारले आणि हिंदुधर्माची पुन्हा स्थापना झाली. तेव्हां ब्राह्मणांनी अहिंसातत्त्व आपल्या धर्मात दाखल केलें जगांत अहिंसा तत्त्वाचा प्रसार करण्यांत महावीर स्वामी जी दृढ़ता दाखविली ती अवतारी पुरुषाखेरीज दुसऱ्यांना दाखवितां येण्याजोगी नाही. जैनधर्मामागून झालेल्या बौद्धधर्मानिहि जनधर्मापासूनच अहिंसातत्त्व स्वीकारले. " मिथात्व वेदमार्गीयानी सोडले. इतकी विलक्षण क्रांति महावीर काली झाली हें आश्चर्य होय. सम्यक्त्वाचा विजय झाला यांत कांहींच आश्चर्य नाहीं. कारण सत्यमेव जयते असा शाश्वत सिद्धान्त आहे. इ. स. पूर्व सहावे शतक हैं भारतवर्षाला तर विशेष महत्त्वाचे आहेच, पण जगाच्या इतर भागांतहि या कालांत विशेष फरक झाले आहेत. भरतखंडांत या शतकांत धार्मिक, राजकीय, सामाजिक व आर्थिक वगेरे सर्वच बाबतीत विलक्षण क्रांति झाली असल्यामुळे भारतीय इतिहासांत हे शतमान फार महत्वाचें आहे. त्यावेळची परिस्थिति जाणण्यासाठी त्यापूर्वी कोणती स्थिति होती तें प्रथम पाहिले पाहिजे. ( ३७ )
......