________________
महावीर पूर्वकाल
भवांत वाचविले होते त्या सर्पाने आपली फणा शुक्लध्यानधारी पार्श्वनाथ स्वामीवर धरून वरील वर्षावांची बाधा त्यांना हाऊ दिली नाही. तपश्चर्येमुळे केवलज्ञान प्राप्त झाल्यावर त्यांनी बरीच धर्मप्रभावना केली व इ. स. पू. ७७६ मध्ये ते सम्मेदशिखरावरून मोक्षाला गेले.
वरीलप्रमाणे वीरपूर्वकालाचा इतिहास आहे. काल अनन्त आहे व जीव अनन्त आहेत. शिवाय एकाच जीवाचे जन्महि अनेक असतात. अशा स्थितीत कोणाचे किती वर्णन कराने व ते कोण करू शकणार. काळाच्या पोटांत पुष्कळ गोष्टी गडप झालेल्या आहेत. त्यांचा अंत कसा लागणार : अंत लावू गेले तरीहि हास्यास्पद प्रयत्न ठरतात व बुद्धी कोती ठरतें असा अनुभव उपलब्ध असलेल्या तुटपुंज्या इतिहासावरूनच येतो; पण इतिहास ही हल्लींची एक विद्या मानिली गेली असल्यामुळे व सत्यास त्याचा निर्णय ऐतिहासिक दृष्टीने करण्याची पद्धत पडली असल्यामुळे हा खटाटोप करावा लागत आहे, पण हा प्रयत्न अगदी अपूर्ण असतो हे विसरता कामा नये. हिंदुस्थानांतच काय पण इतर जगांतहि पता इतिहास लिहून ठेवण्याची पद्धत नव्हती. अलीकडे एकदोन शतकांतच ही पद्धत पडलेली आह. लवकरच ती निरर्थक वाटून समाज सोडून देईल. आता सामान्य जीवांना मार्गदर्शक व्हावे म्हणून काही लिहून ठेवावे लागले व जगांत विलक्षण क्रांती झाल्यास ती आपोआपच पिढ्यान् पिढया लोकांचे लक्षात राहतेच. त्याच कथा मुलाबाळांना सांगण्यात येतात व विद्वान् कवी त्यावरच आपली प्रतिभा खर्चतात. राम व कृष्ण वगैरेंच्या चरित्राची हीच स्थिति आहे. राम व कृष्णकाली विलक्षण क्रांति झाली व ती लोक विसरूं शकत नाहीत. त्या गोष्टी पिढ्यान् पिढया लोकांच्या ध्यानांत राहिलेल्या आहेत. रामायण व महाभारतावरच नंतरच्या प्रत्येक काळचे कवि आपली विद्वत्ता खर्च करीत आहेत. त्याचप्रमाणे शिव, विष्णु, तीर्थकर यांचे स्मरण आदर्श म्हणून लोक ठेवतात. हेहि कधी विसरले जात नाहीत. बाकीचे सर्व मोठमोठे पंडित चक्रवर्ती व इतर सपत्तिमान् काही काळानंतर विसरले जाणे अपरिहार्य आहे. वरील प्रकारच्या आदर्श व क्रांतिकारक पुरुषाची चरित्रे लोकांच्या ध्यानी राहतात तीहि आवडीसाठी व स्फूर्ति मिळविण्यासाठीच होय. म्हणूनच ते जन्मले केव्हां, ते कसे होते वगैरे भानगडीत जनता पडत नाही. मुख्य मुद्याकडे जनता पाहते व इतर गोष्टी विसरून जाते. त्यामुळे हल्ली ज्याला आपण..
(२७)