________________
महावीरचरित्र
त्यांनी परशुरामाचा पराभव केला. पुढे बराच काल लोटल्यानंतर विसावें तीर्थकर मुनिसुव्रतनाथ यांनी राजगृहचे राजा सुमित्र व राणी पद्मामती यांचे पोटी जेष्ठ व. ८ स जन्म घेऊन बरीच धर्मप्रभावना केली. याच वेळीं श्रीरामचंद्र होऊन गेले. पुढें बऱ्याच वर्षांनंतर म्हणजे साठ लाख वर्षांनंतर एकवीसावें तर्थिंकर नोमनाथ यांनी मिथिलापुरांत विजयराजा व विप्राराणी यांचे पोर्टी श्रावण व ॥ ८ स जन्म घेऊन बरीच धर्मप्रभावना केली. बाविसावे तीर्थंकर नेमिनाथ होत. हरीवंशाच्या यदुराजानें मथुरेंत राज्य स्थापले. याच कुळांत बृहध्वत्र व बमुराजा होऊन गेला. पुढे त्यांचे वंशांत शूर नांवाचा राजा जन्मला. त्यास शौरी क सुवीर असे दोन पुत्र होते. शौरीनें शौर्यपुर वसविलें. त्यास अंधकवृष्णि म्हणून एक मुलगा होता. त्याच्या राणीचें नांव सुभद्रा. या जोडप्याचे पोटी समुद्रविजय, सागर व वसुदेव वगैरे दहा मुलगे व कुंती आणि माद्री या दोन मुली जन्मल्या. समुद्र विजय यांची भार्या शिवा हिचे पोर्टी नेमिनाथ तीर्थंकर श्रावण शु॥ ५स जन्मले, व वसुदेव आणि देवकीचे पोटीं कृष्ण चक्रवर्ती जन्मले. शौरीचा भाऊ सुबर यास भोजवृष्णि म्हणून एक मुलगा होता. त्यास उग्रसेन व देवक म्हणून दोन पुत्र झाले. उग्रसेनाचा मुलगा कंस व देवकाची मुलगी देवकी होय. कंसाची बहीण राजीमती ही नेमिनाथाला देऊ केलेली होती. पण लग्नसमारंभांत होत असलेला पशुवध पाहून त्यांना वैराग्य उत्पन्न झाले व त्यांनी लग्नमंडपाच्या वाटेवरूनच परतून निर्ग्रथि दीक्षा घेतली. त्यांनी गिरनार पर्वतावर उग्र तपश्चर्या करून केवळज्ञान प्राप्त करून घेतलें व बरीच धर्मप्रभावना करून ते मोक्षाला गेले त्यांनी एक हजार वर्षांचें आयुष्य भोगलें. याबद्दलचा उल्लेख उत्तरपुराण क हरिवंश या दोन्ही ग्रंथांत आहे.
नेमिनाथ तीर्थकरांचे नंतर ८४ हजार वर्षांनी काशींचे राजा अश्वसेन व वामादेवी यांचे पोटीं तेवीसावें तीर्थंकर पार्श्वनाथ इ. स. पूर्वी ८७६ मध्यें पौप ब।। १० स जन्मले. पार्श्वनाथांनी आठवें वर्षी अणुव्रतें घेतली. हे नऊ हात उंच होते व यांची देहकांती निळी होती. पार्श्वनाथांनी कुमारावस्थेतच दीक्षा घेतली. पार्श्वनाथांनी जेथें दीक्षा घेतली त्याच वनांत पूर्वभवांतील वैर साधण्यासाठीं कमठाच्या जीवानें व्यंतरदेव होऊन त्यांना अनेक प्रकारचें उपसर्ग केले. त्यांच्यावर अग्निवर्षाव केला, पुढें प्रचंड मेघवारा वर्षविली. पण कमठाचा जीव तापसी असतां त्याच्या धुमीत सांपडलेल्या ज्या सर्पयुगलाचे जीव त्यांनी त्या ( २६ )