________________
महावीरचरित्र
इतिहास म्हणतो तसें ऐतिहासिक स्वरूप या चरित्रांना राहिलेले नाही; म्हणून ही चरित्रे खोटी असे मानणे मात्र चुकीचे आहे. हल्लींची पुराणे व धर्मग्रंथ वगैरेमधूनहि फार प्राचीनकाळचा इतिहास मिळतो यांत मुळीच शंका नाही व म्हणून त्यांचे फार महत्त्व आहे. कदाचित् आज ज्याचा इतिहास आपण मोठ्या खबरदारीने लिहून ठेविला आहे तो लोक अजीबात विसरून जातील, व तें लिखाण थुळीस मिळून जाईल. पण तीर्थकर चरित्रं व पुराणे अजरामरच राहतील. पौद्गलिक वस्तु नश्वरच आहेत. मोठमोठे प्रासाद जेथे जमीनदोस्त होतात तेथें ग्रंथांची काय कथा ? एवढेच काय पण जमीन तेथे पाणी, पाणी तेथे जमीन, पर्वत होते तेथे सपाटी व पूर्वी खोलगट जमीन होती तेथें उत्तुंग पर्वत अशा घडामोडी जेथे होत आहेत तेथे जविांची चरित्रे कायम राहतील अशी कल्पना करण्यांत तरी काय अर्थ आहे : म्हणून अनंत कालाचा मुसूत्र इतिहास मिळेल अशी कोणी अपेक्षा बाळगू नये, व तसा आपल्याजवळ आहे अशी कोणी घमेंडहि बाळगू नये. त्याचप्रमाणे असा इतिहास उपलब्ध नाही म्हणून कमीपणा मानण्याचे किंवा प्रगतीला धोका येतो असे मानण्याचेहि कारण नाही. या नश्वर जगांत शाश्वत इतिहास मिळाला तरच नवल! :
पण तारीख व नांवनिशीवर इतिहास मिळाला नाही तरी सामान्य सिद्धान्त हे ठरलेलेच आहेत व ते दिक्कालाद्यविच्छिन्न म्हणजे त्रिकालाबाधित व सर्व देशांना लागू असेच असतात. हे सिद्धान्त माहीत असणे मात्र प्रत्येक व्यक्तीला आवश्यक आहे व ते माहीत होण्यास थोडी माहितीहि पुरी होते. पिंडी ते ब्रह्मांडी अशी म्हणच आहे. एका विवक्षित कालांतील एखाद्या ठिकाणच्या सार्वगिक माहितीवरूनहि आपणांस सर्व ब्रह्मांडाच्या मुळांतील सिद्धान्त अजमावितां येतील, व कोटाकोटी सागरोपमवर्षांच्या कल्पांतूनहि जे तीर्थकर झाले, चक्रवर्ति झाले व असंख्य जीव मोक्षाला गेले आणि भवचक्रांत भ्रमण करीत राहिले, त्या सर्वाची हकीकत एक, अनुभव एक व उपदेशहि एक याचे कारण विश्वांतील मूळसिद्धान्त निश्चित आहेत हेच होय. नामरूपातीत होऊनहि हे सिद्धान्त जाणता येतात. पण सामान्य जीवांना बोध होण्यासाठी विविक्षित कालांतील विशिष्ट नांवाच्या व रूपाच्या व्यक्तींची चरित्रे सांगावी लागतात व यासाठीच पुराणग्रंथ आहेत. जें वर्तमानकाळी घडत आहे तेच पूर्वी घडले व भविष्यकाळींहि तसेच घडणार हे निश्चित होय. जो थोडाबहूत फरक या तिन्ही काळांत दिसेल तोहि
(२८)