________________
महावीरचरित्र
अवर्णनीय आहे. तथापि त्याचे वर्णन करू लागल्यास येथवर दिलेल्या तार्थ करांच्या वर्णनाप्रमाणेच होईल व श्रद्धाहीन सामान्य जनांना ते विश्वसनीयहि पाटणार नाही. ती त्यांची पामरता आहे, पण तीर्थकरत्वाला व सिद्ध पदवीला अस्तित्व आहे व तीच आत्म्याची स्वाभाविक स्थिति आहे यांत मुळीच शंका नाही. असो. - ज्या दर्जाच्या महापुरुषाचे चरित्र आम्ही लिहावयास घेतले आहे त्याचे माहात्म्य प्रथम थोडेबहुत कळावे म्हणून वरील विवेचन केले आहे. त्यावरून शिवाजी, प्रताप वगैरे ऐतिहासिक व रामकृष्णादि पौराणिक थोर पुरुषांहून आणि निम्त, महंमद, बुद्ध वगैरे धर्मसंस्थापकांहन महावीरस्वामीसारखे तर्थिकर अगदी निराळ्या प्रकारचे महात्मे होत ही गोष्ट वाचकांच्या लक्षात येईल. त्यांचे चरित्र म्हणजे प्रत्यक्ष आत्मस्वरूपाचेच खरेखुरे वर्णन. त्याच दृष्टीने अर्थात् या चरित्राकडे पाहिले पाहिजे. हे पौराणिक बाड नव्हे, एखादी कृत्रिम नवलकथा नव्हे, सामान्य इतिहास नव्हे, किंवा अद्भुत वर्णनांचे मनोरंजक साधनहि नव्हे. बालजीवांना ते आकलन झाले नाही तरी प्रत्येक जीवाला केव्हांना केव्हातरी सिद्ध पदवी प्राप्त होणार आहे. म्हणून लौकिक दृष्टि सोडून जर केवळ अध्यात्मिक दृष्टीने हे चरित्र वाचक वाचतील तर त्यांच्या आत्म्यावरहि शुभ परिणाम होतील व शुद्धात्म्याचे महत्त्व जाणण्यास तरी निदान ते खास पात्र होतील. त्या सामर्थ्याची एकदां ओळख झाली म्हणजे आपल्या अंगी ते बाणून घेण्याची हि बुद्धि होईल व मार्गहि सुचेल आणि नंतर तो मार्ग आक्रमिण्याची ताकदहि येईल. सर्व भव्य वाचकांना या चरित्रवाचनाने तर्शः स्फूर्ति होवो हीच तीव्र इच्छा.