________________
प्रकरण २ रें.
जैनधर्माचे प्राचीनत्व. सर्वमङ्गलमाङ्गल्यं सर्व कल्याणकारकम् ।
प्रधानं सर्वधर्मानां जैनं जयतु शासनम् ॥ या विश्वांतील घडामोडींच्या मुळाशी जाऊन जर आम्ही विचार करूं लागलो तर ही गोष्ट स्पष्ट दिसून येणारी आहे की, त्या घडोमोडीच्या मुळार्शी कोणतीतरी दोन परस्पर भिन्न भिन्न अशी अनाद्यनंत तत्त्वे असली पाहिजेत. जगातील सर्व व्यवहार जसजसे अधिकाधिक सूक्ष्म रीतीने पाहावे तसतसे अधिकाधिक हे स्पष्ट होत जाते की, विश्वाची मूलतत्त्वे कमीत कमी दोन असलींच पाहिजेत. या दोन तत्त्वांच्या निरनिराळ्या संबंधाने (मिश्रणानें )च जगांतील असंख्य विचित गोष्टी बनलेल्या आहेत. या दोन तत्त्वांपैकी कोण श्रेष्ठ आहे व ती कशी निर्माण झाली याबद्दल भिन्न भिन्न मते आहेत व जोपर्यंत ही गोष्ट इंद्रियगोचर नाही तोपर्यंत असे भिन्नभिन्न तर्क चालणारच. कोणी म्हणतात की, ही दोन्ही तत्त्वं स्वतंत्र सत्ताधीश आहेत व स्वयंभूहि आहेत; कोणी म्हणतात की, आत्मनत्त्वांतनच प्रकृतितत्व निर्माण झाल; केणी असेहि म्हणतात की, प्रकृतितत्त्वाला निराळे अस्तित्वच नाहीं; तो आत्मतत्वावरील निव्वळ आभास आहे. उलट कोणी असेंहि म्हणतात की, प्रकृतितत्वच मुख्य आहे व चेतन किंवा आत्मतत्व यांतूनच निर्माण होते. पण याप्रमाणे कितीहि मतें असली तरी शेवटी दोन मुलतत्वांबद्दलच वाद असतो. नैयायिक व वैशेषिक मताप्रमाणे सोळा किंवा तेवीस मूलतत्वे आहेत. अलीकडील गंशोधक मलतत्वे जैसष्ट किंवा त्याहूनही अधिक आहेत असे सिद्ध करतात. पण त्यांचे संशोधन अजून प्रयोगावस्थेतच माहे. वरील दोन मलतत्वांना चेतन व जड; आत्मा व प्रकृति; ईश्वर व सृष्टि शक्ति व साहित्य वैगरे निरनिराळी नावें भिन्नभिन्न तत्वज्ञानांतून दिलेली आहेत.' ही दोन्ही तत्वे एकच आहेत किंवा दोन तत्वे नाहीत असे मानणा-यांचीही दिशाभूल चैतन्याच्या भिन्न भिन्न स्वरूपामुळे झालेली आहे. नर्दाच्या प्रवाहांतील चैतन्य
(१३)