________________
तीर्थंकर माहात्म्य
शिवाय वस्त्रत्याग म्हणजे दिगंबरत्व, केशलोच म्हणजे केश उपटून काढणे, एकभुक्तता, उभे राहून भोजन करणें, पात्रें न वापरणें, स्नान न करणें व दंतधावन न करणें हे सात गुण एकंदर अट्ठावीस मूळ गुण झाले. दिगंबरमुनीनें भूमीवर शयन केले पाहिजे व खालील बावीस परीषह सहन केले पाहिजेत. क्षुधा, तृषा, शीत, उष्ण, मशकदंश, नग्नता, अरति, स्त्रीत्याग, चर्या, निषषा, शय्या, आक्रोश, वध, याचना, अलाभ, रोग, तृणस्पर्श, मल, सत्कारपुरस्कार, प्रज्ञा, अज्ञान व अदर्शन. सुनीने आर्त, रौद व धर्मध्यान सोडून केवळ शुक्लध्यानांतच नेहमीं मम असले पाहिजे. याप्रमाणें वागलें असतां सर्व कर्माचा क्षय होऊन मोक्षप्राप्ति होऊन सिद्ध पदवी प्राप्त होते.
' चणे खावे लोखंडाचे तेव्हा ब्रह्मपद नाचे' अशी म्हणच आहे. वरील व्रताचरण किती कठीण आहे ते सर्वांच्या ध्यानांत येईल. ते निरर्थक नसून rati आवश्यक आहे. अनंत कालापासून जडत आलेला कर्मबंध एकदम सुटणें शक्य नाहीं. त्यासाठी सावधानपणे वरीलप्रमाणे तपाचरण केलेच पाहिजे. वरील - प्रमाणे आचरण होणेंच शक्य नाहीं असें म्हणण्यांत कांहीं अर्थ नाहीं. करारी मनुष्याला कांहींच अशक्य नाहीं व आजपर्यंत अनेक मुनिजन वरलि प्रकारची तपश्चर्या करून मोक्षाला जात आले आहेत. वरील व्रतें पाळणे हें येरागबाळाचे काम नव्हे हें खरें व म्हणूनच असे मुनि फारच थोडे असतात. पण तसं तपश्चरण केल्याशिवाय जन्ममरणाच्या फेन्यांतून सुटका होणार नाहीं हें मात्र निश्चित. साधुचें ढोंग करून अध्यात्म साधत नसतें. तें साधुत्व खरेखुरेंच पाहिजे. सेंट पॉलने म्हटले आहे की, ' जर मृतात्मे जीवंत होत नसतील तर खिम्तहि झालाच नाहीं. ' कर्ममलामुळे आत्मा जडवत् बनला आहे. तो जागृत होणें वक्य आहे. हीच गोष्ट जर अशक्य असेल तर तीर्थंकरहि झालेच नाहींत असे म्हणता येईल, एरव्ही नाहीं. अज्ञानी जीव ज्ञानी बनतांना व पापी पुष्यशाली बनतांना आपण नेहमी पाहतों त्याचप्रमाणे पुलाचें दास्य सोडून आत्मा स्वतंत्र व पूर्ण बलशाली होणेही अशक्य नाहीं. आत्म्याचे सामर्थ्य किती आहे, त्याची जाणीव तीर्थंकरांचे माहात्म्य वाचल्यानंतर होते. त्या सामर्थ्यांची थोडीबहुत जाणीव म. गांधी व इतर टॉलस्टायादि साधुसंतांच्या चरित्रावरून होतेच. पण हे साधुमहात्मे सावनावस्थेतच असतात. जो सिद्ध बनला त्याचें सामर्थ्य काय वर्णावें ! तें इंद्रियांना अगोचर आहे व म्हणूनच ( ११ )