________________
महावीरचरित्र.
का असेना जैनधर्म हिंदुस्तानातील आपले स्थान कायम राखून आहे. याला निरनिराळी ऐतिहासिक कारणे असली तरी जैनधर्म हा आर्येतरभारतीय संस्कृतीचा प्रातिनिधिक असल्याकारणाने त्याला हिंदुस्तानदेशाला पारखें व्हावें लागले नाही असे आम्हाला वाटते . . असो.
महावीरतीर्थकराच्या चरित्रांत मतभेद होण्यासारखी स्थळे फार आहेत. पुनः दिगंबर व श्वेतांबर आनायाप्रमाणे ते मतभेद फार दिवसापासून चालत आल्याकारणाने एकपक्षी निर्णय देणे कठीण झाले आहे. एकापक्षाविषयीं दुराग्रह सोटून देऊन निःपक्षपाताने सर्व गोष्टींचा विचार व्हावयास पाहिजे. कित्येक मतभेद असे आहेत की त्याचा एकपक्षी निर्णय देणे सध्या तरी शक्य होईल असे आम्हाला वाटत नाही. पण सर्व जैनब ना मला एवढंच सांगावयाचे आहे की मतभेद आहेत ते प्रत्येकाला माहीत आहेत आणि त्यांच्या संबंधी निःपक्षपाती निर्णय देण्यास सबळ ऐतिहासिक पुरावे कमी आहेत. याकरता मतभेद नुसते वाढवीत न बसतां मतभेदांविषयीं अनुकूल अशी सहानुभूति उत्पन्न करावयास पाहिजे. दोन व्यक्तींच्या मुखचर्येमध्ये ज्याप्रमाणे साम्यता मिळणे कठीण त्याप्रमाणेच एकाच धर्मातल्या दोन सांप्रदायांत मतभेदाभाव असणे हेही तितकेंच दुर्लभ; किंबहुना मतभेद हे असणारच. पण हे मतभेद मतद्वेषाला कारण होऊ नयेत हीच माझी इच्छा.
वीरनिर्वाणकालाविषयी ही बरेच मतभेद आहेत. पण ते सांप्रदायिक नाहीत. प्रस्तुत पुस्तकाच्या लेखकानें बाबूकामताप्रसादी याच्या लेखांचे अनुकरण केले आहे. व प्रचलित वारनिर्वाणसंवत यांत १८ वर्ष मिळविण्याची मला दिलेली आहे. पण लेखकाने दुसऱ्यावर केलेला दुराग्रहाचा आरोप पुन्हां त्याच्यावरच उलट येण्याचा संभव दिसतो. विषय फार कटणि आहे व थोडक्यांत त्याचा ऊहापोहही होण्यासारखा नाही. तरी आम्हाला एवढेच येथे सांगावे वाटते की बाबू कामताप्रसादजीच्या पुस्तकानंतर वीरनिर्वाणकाळ गणनेसंबंधी दोन महत्त्वाचे निबंध प्रसिद्ध झाले आहेत. पंडित जुगलकिशोर यांचा " भगवानमहावीर और उनका समय" या नांवाचा लेख अनकांत, किरणांत प्रसिद्ध झाला आहे. हा पहिला लेख होय. मुनि श्रीकल्याणविजयजी यांचा एक दुसरा उहापोहयुक्त लेन (१८० पानांचा ) नागरी प्रचारणीपनिकेत प्रसिद्ध माला आहे. व हा लेख पुस्तकरूपानेही मिळतो. या दोन्ही लेखांत दिगंबर व
(२०)