________________
प्रस्तावना
बरोबर तंतोतंत जुळतात यांत कांहीच आश्चर्य नाही. काही मते महावीरतीर्थकरांनी गोशालाकडून घेतली असे म्हणणे ऐतिहासिकदृष्टया योग्य ठरत नाही है भावसंग्रहाच्या आधारावरून स्पष्ट होत आहे.
सजयबेलटुपुक्त हा मतस्थापक बुदापेक्षाहि वयोवृद्ध होता.त्याच्या अज्ञेयवादाचा बराच प्रचार झालेला होता. त्याच्या जीवनचरित्राविषयी विशेष काही माहिती सांपडत नाही. पुण्य व पाप या दोन्हींचे स्वरूप नक्की असे समजत नाहीं म्हणून त्याविषयी खात्राचे विधान कोणीही करूं नये असे त्यांचे म्हणणे असे. या त्याच्या मतावरून असे दिसतं का, संजयाला बुद्धीला अगम्य विषयाबद्दल नक्की विधान करण्यास धैर्यच नव्हतं. या मताविषयी मिळणारी माहिती फारच त्रोटक असल्यामुळे यापुढे उगीच जास्ती तर्क लडविण्यांत काही विशेष निष्पन्न होईल असे दिसत नाही.
वर जी निरनिराळ्या मत्प्रचारकाची माहिती दिलेली आहे ती फारच त्रोटक आहे. कारण गांपैकी प्रत्येक मताच म्वतंत्र ग्रंथ आजमितीस मुळीच मिळत नाहीत, किंवा त्यांच्या स्वतंत्र अशा सांप्रदायिक आख्यायिकाही दुर्लभ आहेत. हा त्रोटक माहितीहि अक्षरश: सत्य असेल अशी कल्पनाहि करवत नाही. वरील सर्व मतांच सिंहावलोकन केल्यास व सार्ची मते एकंदरीत पाहिल्यास वर निर्दिष्ट केल्याप्रमाणे या मतांचे जन, बोद्ध बंगरे धर्माबरोबर जं. साम्य आहे व जे वषम्य आहे ते वयक्तिक कल व बुद्धिचित्र्यामुळेच असलेले दिसते. नाता, अदिसा, क्रियाकाण्टाविरुद्ध तक्रार वैगरे लक्षण पाहू गेल्यास ही सर्व मत आर्येतरसंस्कृतिप्रवाहातीलच होती असे म्हणावयास हरकत नाही. गोशाल पार्श्वनाथनाथकरांचा अनुयायी असल्यामुळे तो तरी मुख्यत: आयतरसंस्कृतीमधीलच अमावा.
हा सब मते आज नामशेष झालेली आहेत व प्राच्यसशोधकांशिवाय दुसयांना त्यांची नावे देखील माहीत नाहीत. हिंदुस्तानांत एके काळी उर्जितावस्थेच्या उच्च शिखरावर आरूढ झालेला बौद्धधममुद्धा आज आपल्या मातृभर्मास पारखा झाला आहे. - कालाय तस्मै नमः । परंतु आश्चर्याची गोष्ट ही की, जैनधर्म अनेक प्रकारची संकट सहन करून आजतागायत हिंदुस्तानांतला एक प्रमुख धर्म म्हणून गणला जातो. जैनधर्माचा प्रचार हिंदुस्तानाबाहेर फार झाला होता असे म्हणावयास पुरावे फार त्रोटक आहेत. बाहेरील प्रचाराविषयी काही
(१९)