________________
उपसंहारांत बहुतेक सगळे सांगितले असल्यामुळे अधिक सांगण्यासारखें कांहींच उरलेलें नाहीं. प्रस्तुत ग्रंथ लिहितांना मला बऱ्याच ग्रंथांची मदत घ्यावी लागलेली आहे. त्यांना मी पाहिलें नसतें तर कदाचित् हा ग्रंथ पुढें आलाच नसतां. अशा ग्रंथांपैकी प्रमुखपणे श्री. पं. बाबूकामताप्रसादजी यांचे भगवान महावीर व म. गौतमबुद्ध भगवान् महावीर ' . जैनधर्मभूषण शीतल प्रसादजी यांचा ' जैनधर्मप्रकाश '; व श्री. पं. अशगकवीचे
6
निवेदन.
6
महावीर चरित्र ' होत. याशिवाय इतर बरेच ग्रंथ पाण्यांत आले आहेत व त्यांचा उपयोगहि करून घेतला आहे. त्याची यादी देण्याचें कारण नाहीं. जैनधर्मातील बहुतेक सर्वच ग्रंथांचा की ज्यांत महावीरचरित्रासारख्या ग्रंथलेखनास उपयुक्त होईल असा मसाला मिळू शकतो त्याचा मी उपयोग करून घेतलेला आहे. त्या सर्व ग्रंथकर्त्यांचा मी अत्यंत ऋणी आहे. ग्रंथ लिहून झाल्यानंतर त्यास प्रस्तावना लिहून देण्याचें कार्य माझी ओळख देखील नसतांना, केवळ माझ्या विनंतीवरून आपला अमूल्य वेळ खर्ची घालून रा. ब. श्री. लट्टे व प्रो. ए. एन. उपाध्ये या उभयतांनी अल्पवेळेत पूर्ण करून दिले याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. तसेच पुस्तक - छपाई सुबक व वेळेवर करून दिल्याबद्दल हनुमान प्रेसचे मालक श्री. लक्ष्मणराव भाऊराव कोकाटे यांचाहि मी आभारी आहे. आज तागायत मालेतून निघालेल्या पुष्पांचा सुवास वाचकवर्ग प्रेमाने घेत आले तसा याही पुष्पांचा चिरकाल घेत राहतील अशी आशा बाळगून हे आभारप्रदर्शनात्मक. निवेदन आटोपते घेतों.
" “
ता. मिति मार्गशीर्ष शु. ८ वीरसंवत् २४७७
आपला सर्वांचा नम्र.
"
अज्ञात
3