________________
देवदत्ताचा कबुलीजबाब.
५९
पुढची सर्व हकिकत आपणांस ठाऊकच आहे ? माझी खरी खरी हकीकत काय ती हीच. आतां आपण मला तारा किंवा मारा ! बाकी मला माझ्या नीच कर्माचा आतां अत्यंत पश्चात्ताप वाटत असून आपले राहिलेले आयुष्य कोठें तरी निर्जन प्रदेशांत ईश्वर भक्तींत घालविण्याचा मी निश्चय केला आहे. आपण अत्यंत दयाळू आहांत. तेव्हां माझा जरी भयंकर गुन्हा आहे तरी तो पोटांत घालून आपण मजवर क्षमा कराल अशी आशा आहे."
66