________________
प्रकरण ७ वें
शेवटचा गोड घांस.
वदत्ताची ती हकिकत ऐकतांच सर्व मंडळी आश्चर्याने थक्क झाली ! नंतर अभयकुमार लोकांस उद्देशून ह्मणाला - " सभ्य गृहस्थ हो, या प्रकरणाचा सर्व निकाल आतां लागलाच असून गुन्हेगाराची इत्थंभूत हकीकतही आपण
त्याच्याच तोंडून ऐकली आहे. या भानगडीच्या मुळाशीं कांहीं तरी अलौकिक चमत्कार असावा, असें आरंभींच माझ्या लक्षांत आलें. पण तो बाहेर काढावा कसा हेंच काय तें गूढ होतें. पण नंतर लौकरच त्याचें यथार्थ स्वरूप बाहेर पाडण्याची ही सफल झालेली युक्ति माझ्या डोक्यांत आली ! साधारणपणे व्यवहारांत आपणास असा अनुभव आहे कीं, चमत्काराच्या मागे लागलेल्या लोकांस बिलकुल अक्कल नसते, किंबहुना, ज्याच्या अंगांत काडीची अक्कल नाहीं असेच लोक चमत्कार प्राप्तीच्या मागे लागलेले अततात ! आणि तोच अनुभव आपणास येथेही आला ! या तरुण गृहस्थाच्या अंगांत थोडीशी जरी अक्कल असती तरी तो कोंडलेल्या खोलींतून बाहेर येण्याचा असा मूर्खपणा न करितां, आणि तसें झालें असतें तर आपलें न्यायाचें काम इतकें सुलभ झालें नसतें. तथापि कांहीं झालें तरी असत्य कांहीं शेवट पर्यंत टिकून राहावयाचें
to