________________
रूपिणी.
हेतु सिद्धीस नेण्यास मागे पुढे पाहिले नसते ! मात्र यावेळी तिची सद्गुणनिष्ठा आणि शीलप्रेम किती जागरूक आहे हे माझ्या चांगले प्रत्ययास आले." ___ "तथापि आपला एवढा खटाटोप आणि जन्मजन्मांतरीही जे साधन मिळणे दुर्लभ तें प्राप्त होऊनही विफल झाले हे पाहून, मला त्यावेळी केवढें भयंकर दुःख झाले असेल याची नुसती कल्पनाच करा ! मी दुःखाने आणि संतापाने नुसता वेडा होण्याच्या बेतांत आलो होतो, तथापि प्रसंगावधान धरून तिला आणखी आपल्या सपाट्यांत आणावी म्हणून मी तिच्या पाठोपाठच धांवलों पण ती आपल्या सासुसासऱ्यांच्या आश्रयास जाऊल बसलेली. मला त्यांचे मन वळवून तिला परत खोलीत आणणे मोठे दुरापास्त झाले ! तथापि अखेर मी त्यांत यशस्वी झालों! आणि त्याप्रमाणे आतां त्यांच्या संमतीने मी तिला घेऊन जाणार तोच तिचा नवरा तेथें येऊन दाखल झाला. यावेळी माझी जी त्रेधा उडाली तिचे यथार्थ स्वरूप तुम्हांस समजावून देणे अशक्य आहे ! याचवेळी रूपिणीच्या बाबतींत माझी पूर्ण निराशा झाली! पण घेतलेल्या सोंगाचा शेवटपर्यंत संपादणी केल्याखेरीज गत्यंतर नसल्यामुळे मी त्याच्याशी झगडत राहिलों !"
" तिचा नवरा असा ऐन वेळी तेथे कसा आला याबद्दल मला प्रथम मोठे आश्चर्य वाटले. पण रूपिणीचा संशय खरा आहे की, खोटा आहे हे पहावे म्हणून तिच्या सासऱ्याने शेतांत आपल्या मुलाच्या शोधासाठी गडी पाठविला होता, त्यावरून तो पळतपळतच तेथें आला, असे मला नंतर कळले."