________________
देवदत्ताचा कबुलीजबाब.
५७
जाऊन, कोंबड्याप्रमाणें ओरडलों. त्याबरोबर माझ्या अटक - ळीप्रमाणें घडून आलें. रूपिणीचा नवरा नियमाप्रमाणे शेतांत निघून गेला. वास्तविक ती अपरात्र होती. पण मी काढलेल्या कोंबड्याच्या हुबेहुब स्वरानें तो फसला !"
“तो शेतांत निघून जातांच माझा आनंद गगनांत मावेना ! आतां आपण तिच्या नवऱ्याचें स्वरूप घेऊन तिच्या प्रेमाची यथेच्छ बहार लुटावी असें मी ठरविले. माझें सर्व बाबतींत तिच्या नवऱ्याप्रमाणेंच अगदी हुबेहुब रूपांतर झाले असल्यामुळे तिला आपणाविषयीं शंका येईल अशी नुसती कल्पना देखील माझ्या मनांत येण्याचें कांहीं कारण नव्हतें. नवरा समजून मजशीं ती यथेच्च प्रेमविलास करील अशी माझी पूर्ण खात्री होती. शेताला गेला असतां परत को आलांत म्हणून तिनें विचारिलेंच तर कांहीं तरी गोड सबब सांगूं ह्मणजे झालें ! बस्स, सौंदर्यसंपन्न रूपिणीच्या प्रेमामृताचा आपणास आतां मुबलक स्वाद चाखवयास मिळणार, आणि तो चाखून तृप्त झाल्यानंतर आपण आपले खरे स्वरूप प्रकट करून, "देवदत्तानें केलेली प्रतिज्ञा कशी सिद्धीस नेली तें तिच्या प्रत्ययास आणूं आणि त्या हट्टी, घमेंडखोर, मानी, आणि ढोंगी ललनेचा गर्व नाहींसा करूं !" अशा प्रकारचे मनचे मांडे खात खात मी तिच्या खोलींत शिरलों. पण तेथें गेल्यावर सगळेच पारडे फिरले मला ज्याची कल्पनाही नव्हती ती गोष्ट खरी ठरली! त्या चतुर स्त्रीस माझा पूर्ण संशय आला आणि ती माझ्या सपाठ्यांतून निसटली ! असा प्रकार होईल या विषयीं मला कल्पनाही नसल्यामुळे मी खोलीचे दार अगोदरच लावून घेण्याची खबरदारी घेतली नाहीं. नाहींतर त्यावेळीं बलात्कारानेही मी आपला