________________
५६
रूपिणी.
होऊन गेली. नंतर तो महात्मा तेथून निघून गेला. पण तो कोठें गेला आणि त्याने काय केलें हें मात्र मला बिलकुल कळलें नाहीं ! किंवा मी ते समजून घेण्याचाही प्रयत्न केला नाहीं ! नंतर दुसरे दिवशीं त्याच वेळेला तो पुन्हां तेथें आला आणि ती तोंडांतली जिन्नस पूर्वस्थळीं ठेवताच आपले पूर्वस्वरूप पावला ! हा प्रकारही मी निजल्या निजल्याच पाहिला. यामुळे त्या साधूच्या लक्षांत तें आलें नाही. या नंतर पुढेही त्या महात्म्यानें त्या जिनसेच्या योगानें आपलें असेंच रूपांतर केलेलें मी पाहिलें. तेव्हां त्या वस्तूंतच तें अलौकिक सामर्थ्य असावें अशी माझी खातरी झाली. नंतर एके दिवशीं तो महात्मा बाहेर गेला असतां ती वस्तु काय आहे तें, मी त्या गुहेच्या टोकाला जेथें ती ठेविली होती तेथें हात घालून काढून पाहिलें. तो ती एक गुटिका असल्याचें दिसून आले. आपणापुढे ठेविलेली हीच ती गुटिका. त्याबरोबर तिचें अद्भुत सामर्थ्य पाहण्याच्या अनावर जिज्ञासेनें 'रूपिणीच्या पतीप्रप्रमाणें माझें रुपांतर होवो' अशी इच्छा धरून मी ती तोंडांत धरिली . तो काय आश्चर्याची गोष्ट सांगावी, मी अगदी त्याप्रमाणें बनलों ! या वेळीं मला जो आनंद झाला तो केवळ अवर्णनीय होता ! मला प्रत्यक्ष स्वर्गाच्या किल्ल्याच हाती आल्याप्रमाणें वाटलें. मग मी मागचा पुढचा विचार न पाहतां तेथून सारखा पळत सुटलों ! तो महात्मा येऊन आपणास धरील कीं काय अशी मला धास्ती वाटत होती, पण माझ्या सुदैवाने तसें कांहीं घडून आलें नाहीं ! नंतर कित्येक दिवसांनी येथे येऊन पोंचलों. येथें आल्यावर मी दिवसभर जंगलांत राहून रात्रीं गांवांत फिरत असे. नंतर काल रात्रीं संधि पाहून मी रूपिणीचे घराजवळ