________________
देवदत्ताचा कबुलीजबाब.
प्रेत दहनासहि अडथळा आला. हें पाहतांच त्यांची तळव्याची आग मस्तकाला गेली ! आणि त्या संतापाच्या भरांत चितेच्या ज्वालांनीं जरी मी अगोदरच अर्धमेला झालों होतों तरी तिकडे लक्ष न देतां त्यांनी मला यथेच्छ कुत्रललें ! "
(6
' हा प्रकार घडल्यानंतर मात्र जारण, मारण, वशीकरण वगैरेच्या बाबतीत माझी पूर्ण निराशा झाली आणि पंचाक्षरी लोकांचाही मला तिटकारा आला ! तथापि रूपिणीविपर्यांचे माझें वेड मात्र बिलकुल कमी झालें नाहीं ! तिची प्राप्ति कशी करून घ्यावी हैं कांहीं मला सूचना ! अशा स्थितीत मी सारखा जंगलों जंगली भटकत होतों ! एके दिवशीं माझ्या सुदैवाने एका पर्वताच्या गुहेत मला एक महात्मा भेटला ! त्यावेळी त्याची सेवा करून राहण्याचा मी निश्चय केला. त्याच्या सेवेमुळे होणाऱ्या पुण्य प्राप्तीनें तरी रूपिणीची प्राप्ति आपणास होईल असें मला वाटूं लागलें. नंतर मी त्या महात्म्याची सेवा करीत त्याजजवळ बरेच दिवस राहिलों. पण आपला नीच हेतु त्याला कळविण्याचे मला कधींच धैर्य झालें नाहीं. "
५५
" अशा स्थितीत कर्मधर्मसंयोगाने एके दिवशीं मी जागा होऊन पाहतों तों तो महात्मा सिद्धपुरुष आपल्या तृण शय्येवर नाहीं ! तो कोठें ग्रेला असावा म्हणून मी जरा निरखून पाहूं लागलों, तो गुहेच्या शेवटच्या टोकाला मला त्याची मूर्ति दिसली ! तेथें तो काय करीत आहे हे मी पडल्यापडल्याच पाहूं लागलों. तेव्हां एका खबदडीतून कसलीशी जिन्नस घेऊन ती त्यांनी आपल्या तोंडांत टाकल्याचे मला दिसलें. पण त्याबरोबर चमत्कार काय झाला ! त्या महात्म्याचें एकदम रूपांतर होऊन तो अत्यंत कुरूप व कुष्टरोगग्रस्त असा एक भिकारी बनला. हा प्रकार पाहून तर माझी अक्कल गुंगच