________________
५४
रूपिणी.
आपल्या गृहिणीचे चित्र त्या प्रत्येकाच्या डोळ्यांस दिसत असावें असे मला वाटते ? बायकाचे शहाणपण चुलीपुरतें असें समजणाऱ्या त्या माणसांस या चुलीच्या शहाणपणांतच केवढा विश्वव्यापी शहाणपणा भरलेला असतो याविषयी त्यांना त्या घटकेपर्यंत कल्पना देखील नसेल ! असो, इतक्या थरावर मजल आल्यावर तरी मी शहाणपणा धरावयाला पाहिजे की नाही ? पण नाही ? मला वाढू लागले की, सिद्धि प्राप्त होण्याचा समय कदाचित् हाच असेल ? म्हणून यावेळी आपण जर काही हालचाल केली तर आजपर्यंतचे आपले सारे श्रम फुकट जातील ? "
“मी असा विचार करीत आहे तोंच त्या मंडळांपैकी चार पांच जवान माणसांनी मला उचलून चितेवर निजविलें ? चितेवर ठेविल्या बरोबर तिच्या प्रखर वन्हीचे चटके माझ्या अंगास बसतांच सिद्धि विषयींचे माझे विचार आणि पंचाक्षयाची आज्ञा न मोडण्याचा माझा निश्चय ही एका क्षणांत मावळली. मी मोठ्याने शंखध्वनी करीतच “ मलों ! मलों ! मला वांचवा ! बाहेर काढा!" असें
ओरडतच बाहेर उडी मारली!" ___" हा विलक्षण प्रकार पाहतांच नुकतीच चिते-जवळ येऊन उभी राहिलेली ती भेकड मंडळी " अरे ! भूतरे ! भूत ! खरोखरच भूत ! " असें ह्मणत घामाघूम होत्साती तेथून दूर पळाली !" .
" यावेळी ज्यास अनाथ प्रेत समजून आपण अग्निसंस्कार केला तें खरोखरच प्रेत नसून कोणी तरी महाबदमाष साधनी आहे, हे त्या 'परोपकारी' मंडळीच्या लक्षांत यावयाला फारसा उशीर लागला नाही! माझ्या या पाजीपणाच्या उपद्व्यापाने चिता ढासळून मूळच्या