________________
देवदत्ताचा कबुलीजबाब.
५३
तेव्हां त्यांची दृष्टि मजवर गेली, पण माझी ती नग्न अतएव भेसूर मूर्ति पाहतांच त्यांतील कित्येक फारच भेकड माणसें तर मला पिशाच्च समजून मोठ्याने ओरडतच दूर पळालीं, अर्धवट होतीं तीं जागचे जागींच खिळल्यासारखीं झालीं; आणि विशेष समजूतदार व धीट, खरा प्रकार काय आहे तें समजून घेण्यासाठीं मजजवळ आली.
प्रथम त्यांनी मला हांका मारून पाहिलें, पण मी त्यांना 'ओ' देण्यासाठी थोडाच तेथे येऊन निजलों होतों ! नंतर त्यांनी मला खूप जोरानें हालविलें तरी मी बिलकुल हालचाल केली नाहीं. शेवटी मी खरोखरच मेलों आहे की, जिवंत आहे हें पाहण्यासाठी त्यांनी मला एक मोठ्या जोराने चिमटा घेतला तरी पण " कांहीं झाले तरी 'ब्र' ह्मणून काढावयाचा नाहीं !" हा आमच्या गुरुजीचा हुकूम मी अक्षरश: पाळिला ! आतां मात्र हें शुद्ध प्रेत आहे अशी त्या मंडळीची खात्री झाली. ती मंडळी 'राजद्वारे स्मशानेच यः स्तिप्रति स बांधवः !" अशा विचाराची अत्यंत धार्मिक व परोपकारी असल्यामुळे माझ्या बिनवारसी अनाथ प्रेतास अग्निसंस्कार देणें तिला आपले पवित्र कर्तव्य वाटले !"
1
-
" तथापि नवीन चिता रचण्याचे भानगडींत ते लोक पडले नाहींत. याचे कारण एक तर त्यांच्याजवळ चितेला लागणारे साहित्य तेथे तयार नव्हते ! आणि दुसरें तें आणावयाचें म्हटल्यास बराच वेळ फुकट जाणार होता ! तेव्हां या भानगडींत किंवा त्रासांत न पडतां पेटविलेल्या चितेंतच ही दुसरीही आहुती टाकावयाची असें त्यांनी ठरविलें. कमी पडल्यास हव्या तर मागाहून आणखी गोंवन्या आणून टाकूं असा त्यांनी पोक्त विचार केला ! यावेळीं एकाच तव्यावर अनेक भाकरी भाजणाऱ्या