________________
मग खरा नवरा कोण ?
४७
न्यायाधिशाकडे जर प्रस्तुतचा खटला जाता तर रूपिणीच्या पूर्व चरिताकडे लक्ष देऊन त्याला कोणी तरी एखादा तिचा नवरा ठरविण्यात त्याने फारसा उशीर लाविला नसता. __ नंतर अभयकुमाराच्या डोक्यांत एक विलक्षण कल्पना येऊन, त्याने त्या दोघांसहि दोन निरनिराळ्या खोल्यांत कोंडून ठेविलें, आणि त्यांस 'जो यांतून आपोआप बाहेर येईल तोच रूपिणीचा खरा नवरा समजला जाईल' अशा प्रकारची सूचना दिली. _ न्याय करण्याची ही अजब त-हा पाहतांच त्यां दोघांपैकी एक जणाची तर कंबरच खचली आणि तो मोठ्याने ओरडून ह्मणाला, " महाराज ! असाच जर आपला न्याय असेल तर त्याचा हा तमाशा तरी कशाला उगीच करितां ! हाय रे दैवा! हा श्रेणिकाचा मुलगा मोठा न्यायी ह्मणून सगळे जग वाहवा करीत आहे, पण त्याच्या न्यायाचा मासला हा असा ? अथवा त्याच्याकडे तरी काय दोष ? मीच जन्माचा कपाळकरंटा ? सोड, राजपुत्रा, मलाच येथून काळं करूं दे. ह्मणजे तुला न्यायाचा असा अजब तमाशा करण्याची तरी यातायात पडणार नाही." तो हे बोलणे बोलत असतांना त्याचे डोळे पाण्याने भरून आले. तो यापुढे आणखीही काही बोलणार होता, पण मग तसे करण्यास शिपायांनी त्यास मनाई केली.
पण जी गोष्ट एकास दुःखप्रद झाली तीच दुसऱ्यास अत्यंत आनंदकारक वाढू लागली. या अटीने त्यास एवढा हर्ष झाला, की, त्याच्या भरांत ' आतां रूपिणी माझी, आतां रूपिणी माझी, असें ह्मणत नुसता नाचूं लागला.