________________
४८
रूपिणी.
त्याचे प्रत्यक्ष नृत्य जरी दरबारांतील मंडळीस दिसलें नाहीं तरी त्याचे वरील विजयदर्शक उद्गार मात्र सर्वांस ऐकावयास आले.
खरा प्रकार काय आहे तो याप्रमाणे बाहेर पडला. वास्तविक पाहिले तर याच वेळी या प्रकरणाचा अखेर निकाल करावयास अभयकुमारास काही हरकत नव्हती. कारण त्याच्या प्रमाणेच दरबारांतील इतर चाणाक्ष लोकांसही रूपिणीचा खरा नवरा कोण हे आतां स्पष्ट कळून आले होते. पण आपल्या न्यायांतील सत्याचा प्रकाश अगदी मठ्ठ माणसाच्याहि डोक्यांत पडावा, अशीच अभयकुमाराची नेहमींची न्याय करावयाची पद्धत असल्यामुळे या खेपेसही त्याने तिचाच अवलंब केला.
याप्रमाणे थोडा वेळ गेला नाही तोच खोलीत कोंडून ठेविलेल्या त्या दोघांपैकी एकजण अगदी अचानक बाहेर आला ! ___ हा विलक्षण प्रकार पाहतांच सगळे सभागृह क्षणभर आश्चर्याने थक्क होऊन गेलें ! पण त्याबरोबरच रूपिणीचा खरा नवरा कोण आणि कांही अलौकिक सामर्थ्याने त्याचे हुबेहुब स्वरूप घेतलेला तोतया कोण, हे तेथे जमलेल्या सर्व सभासदांच्या लक्षात येण्यास उशीर लागला नाही.