________________
रूपिणी.
ल्यांत अभयकुमाराने आपले अलौकिक न्यायचातुर्य प्रकट करून त्या प्रकरणांतील सत्य बाहेर काढावयास श्रेणिकमहाराजास सहाय्य केले असल्यामुळे त्यास हे महत्वाचे पद प्राप्त झाले होते. __ तथापि या खटल्याची हकीकत ऐकून त्याचीही अक्कल गुंग होऊन गेली. त्याने त्या दोघांहि तरुणांची कसून तपासणी केली व इतर बन्याच माहितगारांच्या साक्षी घेतल्या, तरी रूपिणीचा नवरा कोण हे त्याच्या बिलकूल लक्षात येईना. ___ या वैचित्र्य पूर्ण जगांत केवळ जन्मतांच दोन माणसांचे चेहरे -सारखे असणे ही गोष्ट केवळ असंभवनीय आहे, या विषयी त्याला बिलकुल शंका नव्हती; आणि या दोघांपैकी कोणी तरी एक लबाड असला पाहिजे ही गोष्ट तर अगदी उघडच होती. तथापि यापैकी लबाड कोण आणि त्याची ही लबाडी बाहेर काढावी कशी हे काय तें मोठे गूढ होते, आणि पुष्कळ विचार केला तरी ते कसें उलगडावें हे त्याला सुचेना.
रूपिणीचे पूर्वीचे दुषणास्पद वर्तन आणि त्याप्रमाणेच मागाहून तिच्या ठिकाणी उत्पन्न झालेली अढळ सद्गुणप्रीति या दोहोंचीही माहिती त्यास बऱ्याच साक्षीदारांकडून झाली होती. काही साक्षीदारांनी तर तिची ही सगुणप्रीति झणजे निवळ ढोंग आहे असे त्यास भासवून त्याचे मन तिजविषयी कलुपित करण्याचा प्रयत्न केला होता पण तो सफल झाला नाही. इतकेच नव्हे तर त्याच्या मनांत उलट तिजविषयी आदर वाढू लागला आणि तिच्या या नूतन विशुद्ध प्रवृत्तीस पोषक असाच न्याय आपल्या हातून तिला मिळावा अशी तो मनांतल्या मनांत परमात्म्याची प्रार्थना करूं लागला. खचित सद्गणास त्याच्यापेक्षा कमी चाहणाऱ्या अशा एखाद्या