________________
मग खरा नवरा कोण ?
४५.
आपली पहिली पतितावस्थाच त्यास शतपट सुखावह भासावयास कशी लावितो हे रुपिणीच्या वरील उदाहरणावरून चांगले लक्षात येईल. असो, रूपिणीला असली असह्य टीका सहन करण्याचे तेव्हांपासून अनेक प्रसंग आले होते, पण ती तिजमुळे बिलकुल डगमगली नाही, किंवा आपल्या निश्चित मार्गापासून ढळली नाही!
रूपिणीच्या निग्रहाबद्दल वाचकांस आश्चर्य वाटेल, पण तिच्या स्वभावांत असलेल्या एका विशेष गोष्टीकडे लक्ष दिले तर तसे आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. मनोवृत्तीचा उत्कटपणा हेच तिच्या स्वभावांतील विशिष्टत्व होय. अशा स्वभावाची माणसें नेहमी या नाही तर त्या टोकावर असावयाची. मधल्या स्थितीत ती असणे केवळ दुर्मिळच; दुर्गुणांत रत झाली तर पराकाष्टेची दुर्गुणी होतील, सद्गणाकडे वळल्यास त्याचे शिखर गांठल्याखेरीज रहावयाची नाहीत.
असो प्रस्तुत भानगड ह्मणजे रिकामटेकड्या स्त्रीपुरुषांना करमणुकीचे व मौजेच एक खमंग पक्कान्नच झालें; व त्याचा यथेच्छ स्वाद घेण्याकरितां तशा प्रकारची पुष्कळ मंडळी तेथें जमली सुद्धां. पण त्यामुळे या संकटांत सांपडलेल्या माणसांला उलट त्रास कसा झाला हे वरील वर्णनावरून लक्षात येईलच. अखेर त्यांतल्या काही सभ्य माणसांनी राजदरबारांत जाऊन या प्रकरणाचा निकाल करून घेण्याविषयी त्या दोघां तरुणांस आणि रूपिणीच्या सासुसासन्यास सूचना केली, आणि तदनुसार ते राजसभेस गेले.
त्या विलक्षण खटल्याची हकीकत ऐकून आणि त्या दोघां तरुणांस पाहून श्रेणिकाच्या दरबारांतील मंडळी आश्चर्याने थक्क झाली.यावेळी न्यायाधिशाचे जागी नुकतीच युवराज अभयकुमाराची नेमणूक झाली होती. मागे अशाच प्रकारच्या एक दोन विलक्षण खट