________________
रूपिणी.
अगोदर आलेला. व 'मागून आलेला. हें एक त्या दोघांत भेद पाहण्याचें साधन होतें. पण उभयतांच्या मारामारीत आणि ढकलाढकलीत तेंहि नष्ट झालें होतें.
४४
C
झाले, अखेर जमलेल्या तमासगिरांपासून रूपिणीचा खरा नवरा कोणता हे ओळखून काढण्यास तर कांहीं सहाय्य झालें नाहीं, पण उलट तिच्या संबंधींच्या कुत्सित टीकेला मात्र ऊत आला.
खरोखर कावळा जसा व्रणासाठीं तसा समाज दुसन्याच्या व्यंगासाठीं नेहमीं टपून बसलेला असतो. आणि एकदां त्यास तें सांपडलें म्हणजे त्याला आपण अगदीं कृतार्थ झाल्यासारखे वाटतें. त्यांतून त्या व्रणाचा संबंध स्त्रियांशीं असेल तर त्याच्या आनंदाला पारावारच उरत नाहीं.
रूपिणीने शीलव्रत घेतल्यापासून ती त्या गांवांतल्या कुत्सित मंडळीच्या बेसुमार टीकेला आधींच पात्र झाली होती. त्यांना तिचें तदनंतरचे शुद्ध वर्तन ह्मणजे नुसतें ढोंग वाटत होतें, आणि पुन्हां त्यांतच ही भानगड उपस्थित झाल्यामुळे तर त्यांना चांगलेच फावलें. त्यांनी या प्रकरणाशी तिचा नसतां संबंध जोडून तिजवर वाटेल तसली कुत्सित टीका करावयास आरंभ केला. आपल्या शीलव्रताचा बिघाड होऊं नये म्हणून नवन्याच्या, एक समयावच्छेदेंकरून अनेक आवृत्त्या निर्माण करण्याची ही रूपिणीचीच शक्कल असावी !" एवढे एकच वाक्य त्या टीकेचा मासला ह्मणून पुरें आहे !
6.
चुकलेल्या माणसास सुधारावयाचें तर एका बाजूला राहो, पण तें आपण होऊनच सुधारणेच्या मार्गाला लागले असले तरी त्याची पहिली चूक पुनःपुन्हां त्याच्या डोळ्यापुढे धरून समाज त्यास सळो कां पळो करून कसा सोडितो, आणि या दुसऱ्या अवस्थेपेक्षां