________________
MPA
MARA.
प्रकरण ५ वें
मग खरा नवरा कोण?
62
दोघांचा याप्रमाणे बराच वेळ झगडा चालला तरी त्यापैकी कोणीच हार जाण्याचे चिन्ह दिसेना ! किंवा त्यापैकी कोणीच आपण लबाड आहों हे कबूल करीना ! यामुळे तर त्या
माता-या आईबापांच्या जिवांची खूपच त्रेधा उडाली. या कारस्थानामुळे आपण आपल्या खन्या मुलास खरोखरच मुकू की काय, अशी त्या बिचाऱ्यांस धास्ती पडून ती मोठमोठ्याने रडू लागली ! रूपिणीचीही तीच अवस्था झाली ! ___ यावेळी चांगले उजाडले असल्यामुळे त्यांच्या या रडण्या ओरड. ण्याने शेजाऱ्यापाजाऱ्यांची व तमासगिरांची तेथे बरीच दाटी झाली होती!
पण त्या तरुणांच्या भांडणाचे कारण आणि त्या उभयतांचे चेहरे आवाज, वय, आणि पोपारख यांचा सारखेपणा वाहन त्यांचीही अक्कल गुंग होऊन गेली ! आईबापाला किंवा बायकोला जेथे आपला मुलगा किंवा नवरा कोणता हे ओळग्वतां येईना तेथे इतर जनांची काय कथा : __ लोकांनी त्या दोघांना नाना प्रकारचे प्रश्न विचारिले, पण ते दोघेही रूपिणीवर आपला मारखाच हक्क तितक्याच जोराने सांगू लागले. आणि दोघेहि एकमेकांस चोर व तोतया ह्मणूं लागले.