________________
४२
रूपिणी.
हा मागून आलेला तरुण तर नुसता संतापाने लाल झाला होता; आंत येतांच रूपिणीचे मणगट धरलेल्या त्या तरुणास ' माझ्या बायकोचे मणगट धरणारा तूं चोर कोण ?' असें ह्मणून त्याने एक जोराने गचांडी दिली. त्याबरोबर 'माझ्या घरांत शिरून माझ्या बायकोला आपली बायको झणणारा आणि मला गचांडी देणारा तूं चोर कोण ?' असें ह्मणून त्या पहिल्या तरुणानेहि या मागून आलेल्या तरुणास जोरानेच गचांडी दिली.
त्या दोघांची याप्रमाणे हमरातुमरी चालली असतांना बिचाया आईबापांच्या जिवाची मात्र त्रेधा उडाली ! त्यांना आपला खरा मुलगा कोणता हेच समजेना; त्यांच्या दांडगाईनें रूपिणीहि शुद्धीवर आली. पण तिचीहि आपल्या सासुसासन्याप्रमाणेच अवस्था झाली. आपला नवरा कोणता हे तिलाही आळखतां येईना ; मात्र आपला संशय खरा ठरला आणि आपण एका अट्टल बदमाषाच्या कारस्थानांतून बचावलों याबद्दल तिला समाधान वाटलें. पण तिचे हे समाधान फार वेळ टिकलें नाही, कारण तिजवरील संकट अजून मुळीच नाहीसे झाले नव्हते. इतकेच नव्हे, तर त्याचे भयंकर स्वरूप अजून प्रकट व्हावयाचे होते यांतून आपण आपल्या पतीसह धडपणे कसे मुझे हाच एक विचार तिचें देहभान नाहीसे करण्यास पुरेसा होता.