________________
२८
रूपिणी.
असलेल्या एका खोलीत जाऊन लपून बसला. वास्तविक पाहिले तर प्रस्तुत प्रकार म्हणजे अत्यंत धाडसाचा परकाष्टेच्या निर्लज्जपणाचा होय. पण ' कामातुराणां न भयं न लजा' या सुप्रसिद्ध उक्तीप्रमाणे अशी माणसें खरोग्वरच पराकाष्टेची निर्लज्ज आणि निर्भय बनतात. त्यांना स्वत:च्या प्राणघाताचे देखील भय वाटत नाही. केवढा हा कामवासनेचा प्रभाव ? असो.
देवदत्त ज्या खोलीत शिरला ती रूपिणीची निजावयाचीच ग्वोली होती. तो तेथे जाऊन बसतो न बसतो तोच ती आंथरुण वगैरे घालण्याकरीतां हातांत दिवा घेऊन तेथे आली. तिचा नवरा अजून शेतांतून आला नव्हता. देवदत्तास तेथे असा अवचित पाहून ती मोठ्याने ओरडणार तोच त्याने नाकावर बोट ठेवून तिला चूप राहण्याविषयी खूण केली. .." अरे देवा ! " रूपिणी मनांतले मनांत उद्गारली. " ज्या कर्माला भ्यावें तेंच पुढे करतोस ना ? आतां मी करूं तरी काय ? हा ह्मणतो त्याप्रमाणे मुकाट्याने बसू ? कां एकदम आरडाओरड करून याला पळावयाला लावू ? करूं तरी काय ? '' पण तिला यापेक्षा अधिक विचार करावयास लावून कांही निश्चित ठरविण्यास त्याने बिलकुल अवधीच राहू दिला नाही. तो एकदम पुढे येऊन ह्मणाला:
" रूपिणी, थांब. गडबड करूं नकोस. मला तुझ्याशी दोनफक्त दोनच-शब्द बोलावयाचे आहेत. त्यांचे सरळ उत्तर तुजकडून मिळाले झणजे मी येथून मुकाट्याने चालतां होईन. तुला बिलकुल भिण्याचे कारण नाही. पण जर तूं मध्यंतरीच गडबड करशील