________________
संकेत.
२७.
पयीं त्याचें मन नानाप्रकारचे तर्कवितर्क करूं लागलें. पण त्यांतील अमुकच मात्र खरा असें त्याला ठरवितां येईना. तिनें आपला ठरलेला बेत फिरविला असावा ही गोष्ट त्यास बिलकुल संभवनीय वाटेना. तिला अजूनपर्यंत संधीच मिळाली नसेल यामुळे तिचें येणें झालें नसावें, असेंच उलट त्यास ठाम वाटत होतें. तथापि न जाणों संधि सांपडल्यास ती अजूनहि येईल अशा प्रकारची आशा मनांत धरून तो दिवस उगवेपर्यंत तिची वाट पाहत राहिला, पण व्यर्थ. फटफटित उजाडलें तरी रूपिणी आली नाहीं. सूर्याच्या किरणजालांनी पृथ्वीतलावरील सर्व अंधकार नाहींसा केला, तरी त्याच्या अंतःकरणांतील निराशेचा गडद अंधकार मात्र तसाच कायम होता ?
झालेल्या निराशेने देवदत्ताचें डोकें अगदीं भणाणून गेलें ! पुढे काय करावें हें त्याला बिलकूल सूचना ! एखादें भयंकर जहर भक्षण केल्याप्रमाणे त्याच्या जिवाची तळमळ होऊं लागली ! अखेर खरा प्रकार काय आहे तो तिला समक्ष भेटूनच विचारावा असा त्यानें निश्चय केला. पण दिवसां गांवांत जाण्यास तोंड नसल्यामुळे त्याला तो सारा दिवस त्या जंगलांतच पशूंच्या सहवासांत काढावा लागला. ठीकच आहे, पशूंच्या सहवासांत एखाद्या नरपशूस राहणें भाग पडले तर त्यांत वावगे तरी काय झालें ? खरें म्हटलें तर असे नरपशु नेहमींच पशुसंगतीत राहतील तर जगांतील पुष्कळच अनर्थ टळतील.
जरा रात्र पडतांच देवदत्त तेथून जो निघाला तों तडक रूपणीच्या घरापुढे आला. ती अंधेरी रात्र असून, घरांत समोर कोणीच नं दिसल्यामुळे तो चटकन आंत शिरला, व अंगणांतच