________________
२६
रूपिणी.
त्याच्या जिनगीची जवळ जवळ अशी लूट होत असलेली पाहून अतिशय वाईट वाटलें ! पण स्वतः मालकच जर आपल्या जिनगीची समजून उमजून अशी विल्हेवाट लावीत आहे तर त्यांना वाईट वाटून काय उपयोग होणार होता ? दुसऱ्याची कोणाची तर त्याला काही ह्मणावयाची किंवा विचारावयाची छाती झालीच नाही. पण मध्यंतरी त्याच्या बायकोने त्याला अडथळा करण्याचे धाडस केले; त्याचा परिणाम इतकाच झाला, की, तिच्या अंगावर चुकून तिचे राहिलेले दागिनेहि त्याने काढून घेऊन त्याची विक्री केली ! अखेर बिचारीला नुसत्या नेसत्या लुगड्यानिशींच माहेरी जाण्याचा प्रसंग आला ! ___ याप्रमाणे मातीमोलाने सर्व जिनगीची विक्री करून, गोळा झालेली रकम बरोबर घेऊन देवदत्त संध्याकाळचे आंत इष्टस्थळी जाऊन पोचला. आतां ठरलेली वेळ केव्हां येते आणि रूपिणांची भेट केव्हां होते असे त्याला होऊन गेले. त्याची उत्कंठा पराकाष्टची वांढ ली. एकेक पळ त्याला वर्षाप्रमाणे वाढू लागले. आतां तर बरीच रात्र होऊन जिकडे तिकडे गडद काळोख पसरल्यामुळे त्याची उत्कंठा अगदीच अनावर झाली, जरा कोठे कांहीं खुसबसले, की, रूपिणीच आली असें त्याला वाटे. पण लौकरच तें एखादें श्वापद असल्याविषयींची जेव्हां त्याची खातरी होई, तेव्हां त्यावेळी चोहीकडे पसरलेल्या त्या काळोखापेक्षाही अधिक भेसूर
आणि गडद आशा निराशेच्या काळोखात त्याचे मन विलीन होऊन जाई. __ अखेर ठरलेली वेळ टळून गेली तरी रूपिणी आली नाही अशी जेव्हां त्याची खात्री झाली, तेव्हां त्याच मन पराकाष्टेचें अस्वस्थ झाले. पण करणार काय ? ती कां आली नसावी या वि