________________
कसोटीला उतरलें.
रात्री आपल्या पतीचे पाय चुरीत असतांना पतिसेवेच्या या मंगलाचरणाचा तिने आजच्याच सुमुहूर्तावर प्रारंभ केला होता-तिने त्यास त्या महात्म्याचे झालेले दर्शन, त्याने पाजिलेले दिव्य उपदेशामृत, आणि त्यामुळे आपणास झालेला पश्चात्ताप याविषयीची इत्थंभूत हकीकत निवेदन केली. यावेळी त्या साधूविषयीं रूपिणीच्या पतिच्या मनात किती पूज्यबुद्धि उत्पन्न झाली असेल, याची नुसती कल्पनाच करावी. असो. आतां आपण खन्या शुद्ध प्रेमामृताचा आजच आस्वाद घेणा-या या जोडप्याच्या सुखांत व्यत्यय न आणतां रूपिणीसाठी वेडा बनलेल्या देवदत्ताची, काय हकीकत आहे ती पाहूं.
रूपिणीचा आणि त्याचा कोठे तरी देशांतरी निघून जाण्याचा बेत ठरतांच तो तिचा निरोप घेऊन शेताकडे जाण्यास निवाला ह्मणून पहिल्या प्रकरणांत सांगितलेच आहे. पण त्याप्रमाणे तो शेतांत गेला नाही. त्याचे मन तिकडे जाण्याकडे बिलकुल लागेना. ठरलेल्या बेताप्रमाणे सर्व जिनगीची विल्हेवाट लावून, तिची मार्गप्रतीक्षा करावयासाठी इष्ट स्थळी केव्हां जाऊन बसतों असें त्यास होऊन गेले, यामुळे शेतांत जाण्याचा बेत राहित करून तो मधूनच घराकडे परतला. __ घरी येतांच त्याने घरांतील चीज वस्त येईल त्या किंमतीस विकावयास आरंभ केला. विक्रीचे असे धोरण ठेविल्यावर कोणत्याहि वस्तूस गि-हाइक मिळण्यास, किंवा तिची विक्री होऊन रोख रकम हाती येण्यास कितीसा उशीर लागणार ? हां हां ह्मणतां त्याच्या सर्व स्थावर जंगम जिनगीची विक्री होऊन, त्याच्या पदरांत रोख दाम पडले. त्याच्या या कृत्याचे पुष्कळांस आश्चर्य वाटले. त्याच्या कित्येक स्नेह्यांस तर