________________
३२
रूपिणी.
करून ह्मणाला. " तुझ्यावांचून माझी काय अवस्था झाली आहे, याची तुला कल्पना देखील नसेल. पण मी तुला खचीत सांगतों की, या दोन दिवसांत जेवण आणि निद्रा ही मला ठाऊक देखील नाहीत। आणि यापुढे तूं आपला हट्ट जर असाच चालविशील तर एका तरुणाच्या हत्तेचें पाप निःसंशय तुझ्या शिरावर बसेल! तूं शीलव्रत घेतले आहेस तर खुशाल घे? त्याच्या आड येण्याची माझी बिलकुल इच्छा नाही. पण फक्त एकच वेळ माझी इच्छा-"
त्याच्या या लोचटपणाचा रूपिणीस जास्तच तिटकारा आल्यामुळे ती त्याचे भाषण पूर्ण होऊ न देतां मध्येच ह्मणाली:___ " देवदत्त, तुला में सांगावयाचें तें मी अगोदरच स्पष्टपणे सांगितले असून तूं पुन्हां आपली तीच फाजीलपणाची बडबड चालविली आहेस याला काय ह्मणावें ? तुला आतां माझें शेवटचे एकच सांगणे आहे की, तूं पुन्हां एक अक्षरंहि न बोलता येथून चालता हो.'' . "हे भूमीवरील अप्सरे ! या दीन दासाला नको ग असा दूर ढकलू"
खुपामतीच्या मात्रेचा थोडासा वळसा तरी लागू पडतो की नाही ते पाहण्याचा हेतूनें तो ह्मणाला :-.--.' रूपिणी ! सुरूपिणी ! आपल्या सौंदर्यान रतिलाहि लाजविणा-या सुस्वरूपिणी ! तुझ्या आधीच वांकड्या असलेल्या त्या भिवया, आणखी नको ग अधिक वांकड्या करूंम ! आणि त्या अष्टमीच्या चंद्रासारख्या तुझ्या मनोहर कपाळावर तें विशोभित आठ्यांचे जाळेंहि असें नको पसरूंस ! खचित नीलकमलाचे सौंदर्य हरण करणाऱ्या तुझ्या या रमणीय नेत्राला हे हृदय भेद करणारे तत्रितर कटाक्ष, आणि कमलगर्भासारख्या नाजुक देहाला हे प्रस्तरतुल्य निष्ठर हृदय, बिलकुल शोभत नाहीं ! त्याचप्रमाणे निरंतर अमृतरस स्रवणारे तुझे हे ओष्ट त्या