________________
संकेत.
कल्पना नसे ! आपणासंबंधीं गांवांत चाललेली निंदा कधीं कधीं तिच्याही कानांवर येई, पण त्यामुळे देखील आपल्या चंचल स्वभात्रांत फरक करण्याइतका परिणाम तिच्या मनावर कधींच झाला नाहीं !
लोकनिंदेचा तसाच सासूसासऱ्यांच्या उपदेशाचा किंवा शिव्याशापांचाही तिच्या मनावर बिलकुल परिणाम झाला नाहीं; किंवा होत नसे. तिचा नवरा तर काय, बिचारा अगदीं सात्त्विक. सारा दिवसभर आपल्या कामांत गढलेला. त्याने दिवस उगवण्याचे आंतच शेताला जावें, तो प्रहररात्र उलटल्यावर घरी परत यावे. पण त्याला तिथे सुख किंवा आनंद यांचा ह्मणून बिलकुल लाभ होत नसे.
आपल्या स्वभावदोषानें आपण आपल्या पतीस दुःखी करीत आहोत, आणि त्यामुळे उभयतांचेही जीवन रूक्ष होत आहे, संसारांतील वन्या सौख्यास उभयतांही मुकत आहोत, हें त्या अभागिनीस कळत नव्हतें !
अशा प्रकारची या तरुणीची स्थिति असून शेतांत जाण्याकरितां अणून ती आज घरांतून निघाली होती, तो वाटेंत प्रस्तुत प्रकरणाच्या आरंभी सांगितल्याप्रमाणे प्रकार घडून आला.
तिला ज्यानें आडविलें तो तरुणही राजगृह नगरींतलाच राहणारा असून, तो एका भिक्षुकाचा मुलगा होता. त्याचे नांव जरी देवदत्त होते, तरी त्याची वागणूक आणि आचरण पाहून त्याला " दानवदत्त' हेच नांव विशेष यथार्थ शोभले असतें, असें कोणासही बाटल्याखेरीज राहते ना ! त्याचा बाप जरी भिक्षुकीचा धंदा करीत असे, तरी त्याच्या सांपत्तिक स्थितीबद्दल राजगृह नगरीतील मोठ-मोठ्या लक्ष्मीपुत्रांनाही हेवा वाटत होता ! आणि मोठमोठ्या उला