________________
रूपिणी.
ढाली करून रात्रंदिवस तोट्या- नफ्याच्या विवंचनेत जळणा-या कित्येक व्यापा-यांना तर त्याचीही स्पृहणीय सांपत्तिक स्थिति पाहून, आपण आरंभींच या बिनभांडवली पण बिनकाळजीच्या धंद्यांत कां पडलों नाही, असे होऊन जाई !
या गृहस्थाच्या--नव्हे भिक्षुकाच्या ठिकाणी आपल्या धंद्याची हतोटीही तशीच अजब असे. भाळी भावडी सावजे चटकन दृष्टीस पडत आणि तो हां हां ह्मणतां त्यांची शिकार करी. एखाद्या लक्ष्मी पुत्राचा एकुलता एक पुत्र आजारी पडणे, एखादा व्यापारी पैशाच्या पेंचांत येणे, किंवा एखाद्या अबृदार माणसांवर राजाची कसली तरी तोहमत येणे, याला तो आपल्या धंद्याचा उत्कृष्ट मोसम समजत असे. त्यावेळी न्याने त्या संकटांत सांपडलेल्या माणसाकडे जाऊन त्यास एखाद्या ग्रहान्या पीडेचा. किंवा ग्रामदेवतेच्या क्षोभाची अशी कांहीं सडकून तंबी द्यावी, की, त्या ग्रहांना किंवा देवतांना आंवरून धरण्यासाठी त्यांनी याचे पायच घरले पाहिजेत ! अर्थात् मग हे भिक्षुक महाराज मागतील तेवढी दक्षिणा ते देत, आणि सांगतील तेवढा खर्च करीत . अमक्याला शनी पायीं आला, एवढे याला समजले. की, यार्चा पायपिटी तेथे सुरू झालीच ! आणि अनेक वेळां यजमानाकडून याचे उखळ इकडे पांढरे होतांच तिकडे ग्रहही आपली तोंडे काळी करीत .
शेतकरीवर्गाला तर हा भिक्षुक नुसती दुभती धनूच नव्हे, तर कामधेनु वाटत असे! त्यांच्या गरीब स्वभावाबद्दल तर प्रश्नच नाही : अंगी साधारण धूर्तपणा असला ह्मणजे पुरे ! मग वाटेल त्याने ह्यांना पिळावें ! हा भिक्षुक तर धूर्तपणाचा अगदी पुतळाच असल्यामुळे तो निरनिराळ्या मागांनी त्याना पिळून त्यांच्या जवळील द्रव्याचे हरण कसा करीत असेल, ते निराळे सांगण्याची गरज नाही.