________________
रूपिणी.
तांना क्षणभर आपण अशाच स्थितीत ठेवून त्यांचा पूर्ववृत्तांत काय आहे तो पाहू या.
प्रस्तुतचे कथानक भूपाल शिरोमाणि महाराज श्रेणिकांच्या वेळचे असून, उपरिनिर्दिष्ट तरुणी त्यांच्याच राजधानीतील ह्मणजे राजगृह नगरीतील एका शेतकऱ्याची बायको होती. हिच्या नवऱ्याचे नांव बळिभद्र असून हिचे नांव रूपिणी होते. ही रूपाने फारच सुंदर असून, हिचा चेहराही अत्यंत मोहक होता. तिच्या ठुसलुशीत बांध्याने तर, तिच्या मोहकतेत विशेपच भर घातली होती। पण हिचे बाह्यांग जितके मनोरम तितकेच तिचे अंतरंग घाणेरडे होते. तिच्या ठिकाणचा हा घाणेरडा दुर्गुण ह्मणजे तिच्या मनाची चंचलता होय. याच दुर्गुणामुळे तिचे इतके उत्कृष्ट सौंदर्यही केवळ प्रेतावरील पुष्पाप्रमाणे तिरस्करणीय झाले होते!
इतक्या सुंदर शरीरांत असल्या निंद्य दुर्गुणाचा कसा प्रादुर्भाव झाला, या नाजुक फुलाच्या अंतरंगांतही दारुण विपारी कीड कशी शिरली, याविषयी यथें मीमांसा करण्याची आवश्यकता नाही. येथे इतकेच सांगणे पुरे आहे की, तिची बाल्यावस्थेतील परिस्थितःच पुष्कळ अंशी या दुर्गुणास कारणीभूत झाली होती.
तिच्या अशा प्रकारच्या स्वभावामुळे गृहकार्याकडे किंवा गृहिणी.. विषयक कर्तव्याकडे तिचे बिलकुल लक्ष नसे. नट्टापट्टा आणि नखरा यांतच तिचा बहुतेक सारा वेळ जाई ! यामुळे तिजसंबंधीं गांवांत नानाप्रकारच्या कंड्या पसरलेल्या असत . टवाळ लोकांना काय ? जरा कोठे व्रण सांपडावयाचा अवकाश. की, केलाच त्यावर सान्यांनी मिळून : दश! पण या योगाने तिच्या गरीब पण अब्रुदार सासूसासऱ्यांच्या मनाला केवढ्या वेदना होत, याची त्यांना किंवा खुद्द रूपिणीलाही