________________
संकेत.
२
लवमात्रही भंगले जाणार नाही आणि त्याचा भंग करण्याचे सामर्थ्य तुझ्याच काय, पण जगांतील कोणत्याही मानवी प्राण्याच्या कोपांत नाही ! रूपिणी, मी हे उगाच काही तरी बडबडतो असें नाहीं ! माझे शब्द माझ्या हृदयाला फोडून निघत आहेत ! ही माझ्या अंतःकरणाची भाषा आहे ! आणि माझ्या या अभंगप्रेमाची साक्ष ह्मणून माझी सारी धनदौलत आणि माझा देहही मी आज तुला समर्पण करीत आहे. काय ? अजूनही माझ्या प्रेमाची तुला खातरी पटत नाही ? अजूनही तुझ्या मनांतील राग नाहीसा होत नाही ? अजूनहि मी तुझ्या अनुरागाला पात्र होत नाही ? नाही ! नाहीं ! रूपिणी, आज मी तुला मजवर अशी अप्रसन्न राहू देणार नाहीं ! माझ्या या एकनिष्ट भक्तीने किंवा पूजाद्रव्याने माझी हृदयदेवता जर मजवर प्रसन्न होत नसेल. तर आज मी तिजपुढे आपल्या प्राणाचाही बली समर्पण करण्याचा निश्चय केला आहे; आणि हा पहा त्याचा आरंभ !" एवढे बोलून त्याने आपल्या डोकीच्या फेट्याचा फास गळ्याला लाविला; आणि आतां तो जोराने ओढणार, इतक्यांत त्या तरुणीने त्याचे दोन्ही हात जागचे जागी बळकट धरून ह्मटलें:
थांबा ! थांबा ! देवदत्त, असे साहस करूं नका ! तुमच्या प्रेमाची परीक्षा पाहण्याकरितांच मी तुमच्याशी क्षणभर अशी निष्ठरतेने वागलें ! पण खरं पुसाल तर तुह्मांला पाहिल्या दिवसापासूनच माझं मन तुमचंवर जडलं आहे ! पण आपण हा केवढा आततायीपणा आतां चालविला होता ? बाई ! बाई ! शर्थ झाली पुरुषांच्या या उतावळेपणाची ! ___ या वेळी बहुपतिक वसुंधरा जशी भानूच्या, तशी ती तरुणीही त्या तरुणाच्या करपाशांत बद्ध झाली होती ! वाचकहो ! या उभय