________________
रूपिणी.
CC अहाहा ! आज खरोखरच माझें भाग्य उदयाला आलें ! " एका तरुणाने एका तरुणीस आडवून झटले.
" हं ! खबरदार मला अडवाल तर !" तरुणीनें संतापून झटलें. पण तो तरुण कसला निगरगट्ट ! तो तिच्या संतापाला बिलकुल न जुमानतां ह्मणादयः
“अशी सोन्यासारखी आलेली संधि मी दवडीन असें तुला वाटतें ? प्यारी, आज किती तरी दिवस मला तुझा ध्यास लागून राहिला होता. देवाशपथ आणखी कांहीं दिवस तुझी भेट न होती तर मी खचित जिवंत राहिलो नसतों ! "
२
" पुरे करा हा चाहटळपणा ! दुसऱ्याच्या बायकोशी असं बोलायला तुझांला शरम नाहीं वाटत ? " तरुणीनें उत्तर दिले.
खरोखर या वेळी तिनें रागाचा असा कांहीं आविर्भाव आणिला होता, कीं, दुसरा एखादा साधारण लुच्या आणि कमी निर्लज्ज मनुष्य असता, तर तिची ताबडतोब क्षमा मागून तेथून चालता होता. पण तो तरुण अशा कामांत पक्का निर्ढावलेला. शिवाय त्याला विशिष्ट प्रकारच्या स्त्रियांच्या स्वभावाची माहितीही चांगली होती. यामुळे तो बिलकुल न डगमगतां तिला ह्मणाला :---
"रूपिणी, असला डौल घालण्यांत काय अर्थ आहे बरें ? तुझ्या या खोड्या रागाला मी भिईन असें कां तुला वाटते? खरोखरच जर तुला असे वाटत असेल तर ही भ्रामक समजूत अगोदर तूं आपल्या डोक्यांतून काढून टाक. नको ! नको ! प्यारी, त्या तुझ्या कुटिल भिवया नको अशा वर चढवूस. तुझ्या या भ्रूभंगाने माझा प्रणयभंग न होतां मनोभंग मात्र होत आहे ! खरोखर तुझ्या या तीव्रतर हक्प्रहारांनी फार तर माझ्या हृदयाचा चुराडा होईल. पण माझें प्रेम ? छे: तें