________________
पर्यंत त्यापासून सर्वथा कर्माचा परित्याग होणें असंभव आहे, कांकी गीतेचें कथन आहे की "नहि देहभृता शक्यं त्यक्तुं कर्माण्यशेषतः,,
तथापि "योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रियः ॥ सर्वभूतात्मभूतात्मा, कुर्वन्नपि न लिप्यते, गीतेंत सांगितलेल्या ह्या कथनानुसारे जो योगयुक्त, विशुध्दात्मा, जितेंद्रिय आणि सर्वभूताविषय आत्मबुध्दी ठेविणारा मनुष्य असतो, तो कर्माना करूनही त्यापासून अलिप्त राहतो...
वर सांगितलेल्या ह्या सिद्धांतावरून वाचकांच्या लक्षांत आतां हें चांगल्या प्रकारें येऊन जाईल कीं, जे सर्वव्रती ह्मणजे पूर्ण त्यागी मनुष्य असतात, त्यांच्याकडून जी कांहीं सूक्ष्म शारीरिक हिंसा होते. तेचे फळ त्यांना कां मिळत नाहीं ? याचकरितां कीं, त्यांच्यापासून होणाऱ्या हिंसेंत त्यांची भावना हिंसक नसते आणि हिंसक भावनेशिवाय, झालेली हिंसा, हिंसा ह्मणविटी जात नाहीं याकरितां आवश्यक महा-भाष्य नांवाच्या आप्त जैनग्रंथांत सांगितले आहे कींः-
असुभपरिणाम हेऊ, जीबाबाहो त्ति तो मयं हिंसा । जस्स उ न सो निमित्तं, संतोवि न तस्त्र सा हिंसा ॥
अर्थः--कोणत्याही जीवास कष्ट पोहोचविण्याविषर्थी जे अशुभ परिणाम कारणीभूत असतात, ती तर हिंसा आहे आणि वरून हिंसा माहीत पडत असली, तरीही जेथे ते अशुभ परिणाम कारणीभूत नाहीत, ती हिंसा ह्मणविली जात नाहीं. हीच गोष्ट आणखी एका ग्रंथांत. या प्रकारे सांगितली आहे.
जं नडु भणिओ बंधो, जीवस्स बहेवि सामइगुत्ताणं ॥ भावी तत्थ पमाणं कायवावारी ॥
धर्मरत्न मंजूषा. पृष्ठ ८३२.