________________
199
प्रकारांत कांहींच भेद नसला, तरीही आलिंगन करणाऱ्याच्या आंतरिक भावनेत फारच मोठा भेद अनुभविला जातो. पत्नीशीं आलिंगन करीत ' असतां पुरुषाचें मन आणि शरीर जेव्हां मलिन विकारयुक्त भावनेनें भरलेलें असतें, तेव्हां माता वैगैरेशीं आलिंगन करीत असतां मनुष्याचे मन निर्मळ शुद्ध सात्विक वत्सल भावनेने भरलेले असते. कर्मा (क्रिये) च्या स्वरूपांत कांहींच फरक नसतांही फळाच्या स्वरूपांत इतका विर्पयय . (फरक) का असतो ? याचा जेव्हां विचार केला जातो, तेव्हां स्पष्टच माहीत पडते कीं, क्रिया करणाऱ्याच्या भावनेत विपर्यय असल्यामुळे फळाच्या स्वरूपांत विपर्यय आहे. याच फळाच्या परिणामावरून कर्त्याच्या मनातील भावनेसंबंधी चांगलेपणा किंवा वाईटपणा याबद्दल निर्णय केला जातो. त्याच मनोभावनेच्या अनुसारें कर्माचें शुभाशुभपण मानिलें जाते; ह्मणून यावरून हें सिद्ध झालें कीं, धर्म-अधर्म, पुण्य-पाप किंवा सुकृत- दुष्कृताचे मूळ फक्त मनच आहे.
॥
भागवत धर्माच्या नारद पंचरात्र नामक ग्रंथांत एके ठिकाणी असें सांगितले आहे की :- मानसं प्राणिनामेव, सर्वकर्मैककारणम् ॥ मनोऽनुरूपं वाक्यं च वाक्येन प्रस्फुटं मनः ॥ अर्थः- प्राण्यांच्या सर्व कर्माचें मूळ फक्त मनच आहे, मनाच्या अनुरूपार्नेच मनुष्याची वचन व शरीर प्रवृत्ति होते, आणि त्या प्रवृत्ती पासून त्याचे मन माहीत पडते.
या प्रकारे सर्व कर्माच्या ठिकाणीं मनाचेच प्राधान्य आहे, हाणून आत्मसंबंधी विकास करण्यामध्यें प्रथमारंभी मनाला शुद्ध आणि संयत ( सम्यक् ज्ञान - दर्शन - चारित्र रूप मोक्षमार्गाच्या ठिकाणीं चांगल्या प्रकारें प्रयत्न करणारा ) बनविण्याची आवश्यकता आहे. ज्याचे मन याप्रमाणे शुद्ध आणि संयत होते, तेव्हां तो कोणत्याही प्रकारच्या कर्मापासून लिप्स होत नाहीं. यद्यपि जेथपर्यंत आत्म्याने देहाला धारण केले आहे, तेथ