________________
"(२) जे मे जीवा विराहिया, एगिंदिया बेइंदिया,, वैगर पाठाचे उच्चारण करीत होता, तेव्हां कोणी एका सैनिकाने त्यास ऐकन को एका अधिकाऱ्यांस सांगितले की, पहा महाराज! आमचे सेनापति साहेब तर अशा युध्दाच्या मैदानामध्येही (जेथे शस्त्र व अस्त्रांचा ठणठणाट होऊन राहिला आहे आणि मारा मारा असे शब्द निघून राहिले आहेत तेथे ) एगिदिया बेइंदिश करून राहिले आहेत. नरम नरम शीरा खाणारे हे श्रावक साहेब काय बहादुरी करून दाखवितील १ हळुहळू ती गोष्ट थेट राणीच्या कान पर्यंत जाऊन पोचली. हे ऐकून ती फारच संशययुक्त बनली, परंतु त्यावेळी दुसरा कांहींच विचार करावयाचा नव्हता, . ह्मणन भावण्या आधार ठेवून ती गुपचुप राहिली. .
दुसऱ्या दिवशी प्रात:काळापासूनच युद्धाचा प्रारंभ झाला, योग्य संधि (वेळ) पाहून सेनापति आभनें अशा शौर्याने आणि चातुर्याने शत्रवर आक्रमण केले की, त्यामुळे थोड्याच वेळांत शत्रुच्या सैन्याचा फार संहार झाला आणि त्याच्या मालका (सेनापती) ने आपले शस्त्र खाली ठेऊन युद्ध बंद करण्याविषयी प्रार्थना केली.
आभूचा अशा प्रकारे विजय झाला हे पाहून अणहिलपुरच्य प्रजेंत जयजयकाररूप आनंद फैलावला. राणीने विशेष सन्मानपूर्वक त्याचे स्वागत केले आणि त्यानंतर मोटा दरवार करून राजा व प्रजेकडून त्याचा योग्य सन्मान करण्यात आला. त्यावेळी राणीने हंसत असतां दंडनायकाशी सांगितले की, हे सेनापती ! जेव्हां युद्धाची व्यहरचना करीत असतां मध्येच आपण "एगिदिया बहदिया,, बोलूं लागले होते, तव्हां तर आपल्या सैनिकांना देखील असा संशय आला ।
(२) अर्थ:- ज्या जीवांना फक्त एक शरीरच इंद्रिय आहे. ज्यांना दोन इंद्रियें, तीन इंद्रियें, चार इंद्रिये आणि पांच इंद्रिये आहेत, अशा जीवांची मा विराधना (हिंसा) केली असेल. वगैरे पाठ प्रतिक्रमणाच्या आधी बोलावा लागतो.
अनुवादक.