________________
".
झाली. त्या राणीने विश्वस्त आणि योग्य मनुष्या कडून सेनापति आभूच्या सामर्थ्या विषयी काही वृत्तांत ऐकून, स्वतः तिने त्यास आपल्यापाशी बोलाविलें आणि नगरावर आलेल्या आपत्तीविषयी कोणता उपाय केला पाहिजे, याबद्दल सम्मत्ति विचारिली. तेव्हां सेनापतीने सांगितले की, जर महाराणीचा माझ्यावर विश्वास असेल आणि युध्दासंबंधी पूर्ण सत्ता मला सोपवून दिली जाईल, तर मला भरंवसा आहे की, मी आपल्या देशाला शत्रच्या हातातून पूर्णपणे वाचवीन. आमच्या अशा प्रकारें उत्साहजनक वाक्यास ऐकून राणी खूश झाली आणि युध्दासंबंधी पूर्ण सत्ता त्यास देऊन, युध्दाची घोषणा करून दिली. सेनापति आभू याने त्याच वेळी सैनिक संगठन करून रढाईच्या मैदानांत डेरा दिला. दुसऱ्या दिवशी प्रातःकाळापासून युध्द सुरु होणार होते, ‘ह्मणून पहिल्या दिवशी आपल्या सैन्याचा जमाव करता करतांच त्यास संध्याकाळ झाली. तेो व्रतधारी श्रावक होता, ह्मणून दररोज सकाळी व संध्याकाळी 'प्रतिक्रमण करण्याचा त्यास नियम होता. संध्याकाळ पडल्यानंतर प्रतिक्रमण करण्याची वेळ आली असें पाहून, त्याने एकांतांत कोठेतरी जाऊन प्रतिक्रमण करण्याचा विचार केला; परंतु त्याच वेळी माहीत पडले की, त्यासमयी त्याचे तेथून दुस-या ठिकाणी. जाणे, इच्छित कार्यांत विघ्न करणारे होते, ह्मणून त्याने तेथेच हत्तीच्या अंबारीवर बसल्या बसल्याच एकाग्रतेने प्रतिक्रमण करण्यास सुरू केले. जेव्हां तो प्रतिक्रमणांत येणाऱ्या
(१) पापक्रियेपासून मागे हटण्याकरितां घेतलेल्या व्रतांचे सकाळी व संध्याकाळी पश्चात्तापपूर्वक चिंतन करणे, त्यांस जैन शास्त्रांत प्रतिक्रमण असें ह्मणतात.